Saturday, January 4, 2025
Homeब्रेकिंगबसमध्ये चोऱ्या करणारा आजीबाईंच्या सतर्कतेने जेरबंद; बांगडी चाेरताना लक्षात येताच पकडले अन्.

बसमध्ये चोऱ्या करणारा आजीबाईंच्या सतर्कतेने जेरबंद; बांगडी चाेरताना लक्षात येताच पकडले अन्.

 

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील किंमती ऐवज चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना प्रवासी आजीबाईंच्या सतर्कतेने चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. सातारा रस्त्यावर हा प्रकार घडला असून, पीएमपी प्रवासात या चोरट्याने आजीबाईंच्या हातातील बांगडी कटरने कापली पण, हा प्रकार लक्षात येताच आजींनी त्याला पकडले आणि आरडाओरडा केला. त्यानंतर पोलिसांना बोलवत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आजीबाईंमुळे चांदबाबु अलीहुसेन शेख (वय ३०) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघड झाले आहेत.तक्रारादार ज्येष्ठ ‌महिला जांभूळवाडीत राहायला आहेत. त्या स्वारगेट ते जांभूळवाडी मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरटेही बसमध्ये होते. दरम्यान, बसमध्ये जागा न मिळाल्याने ज्येष्ठ महिला उभ्या राहिल्या होत्या.

 

तेव्हा गर्दीत महिलेच्या हातातील ४० हजारांची सोन्याची बांगडी कटरने कापली.हातातील बांगडी कापून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला ज्येष्ठ महिलेने पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. चोरटा व साथीदार बस थांब्यावर उतरले. पद्मावती परिसरात प्रवासी आणि नागिरकांनी पाठलाग करुन पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेखबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -