रोहित शर्मा रन आऊट झाल्याने संतापला, भर मैदानात शुबमनला शिव्या?
अफगाणिस्तानने पहिल्या टी 20 सामन्यात विजयासाठी दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. यशस्वीला दुखापत झाल्याने तो पहिल्या सामन्यातील निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे यशस्वीऐवजी शुबमन कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंगला आला. मात्र या सलामी जोडीत झालेल्या गडबडीमुळे टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. टीम इंडियाला दुसऱ्याच बॉलवर पहिली विकेट गमावण्याची वेळ आली. रोहित शर्मा झिरोवर रनआऊट झाला. त्यामुळे रोहित शुबमनवर संतापला. रोहितच्या संतापाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अशी झाली गडबड
फझलहक फारुकी याने पहिली ओव्हर टाकली. स्ट्राईकवर असलेल्या रोहितने पहिल्या बॉल डॉट केला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर फटका मारला आणि तो धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने धावत सुटला. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या शुबमन गिल याने बॉल फिल्डरच्या आसपास जात नाहीये ना, हे पाहत राहिला. मात्र तोवर रोहित नॉन स्ट्राईक एंडवर येऊन पोहचला. दोघेही एकाच बाजूला पोहचले. तेवढ्यात अफगाणिस्तानचा कॅप्टन इब्राहिम झद्रान याने विकेटकीपर रहमानुल्लाह गुरुबाजच्या दिशेने अर्थात स्ट्राईक एंडवर बॉल फेकला. मात्र शुबमनने क्रीज न सोडल्याने स्ट्राईक एंडवर गुरुबाजने रोहितला रनआऊट केला. त्यामुळे रोहितला झिरोवर परतावं लागलं.
रोहितला 14 महिन्यांनी अशा पद्धतीने आऊट व्हावं लागलं. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे रोहित मैदानाबाहेर जाताना शुबमनवर चांगलाच डाफरला. रोहित शुबमनला जाता जाता चांगलंच सुनावून गेला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ आता तुफान व्हायरल होतोय.
रोहितची सटकली, पाहा व्हीडिओ
It was an easy run. Shubman Gill did not moves from his place.Rohit Sharma was looking very angry ..!!#INDvsAFG pic.twitter.com/RYEaQcvVer
— narsa. (@rathor7_) January 11, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.