Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंगफ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका, एकदम स्वस्तात मिळवा हे 3 स्मार्टफोन

फ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका, एकदम स्वस्तात मिळवा हे 3 स्मार्टफोन

 

 

Flipkart | Apple सह इतर अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन फ्लिपकार्टवर अगदी स्वस्तात खरेदीची संधी मिळत आहे. जर जुन्या स्मार्टफोनचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर बाजारातील नवीन दमदार स्मार्टफोनवर तुम्हाला जोरदार डिस्काऊंट मिळत आहे. तर चला जाणून घेऊयात कोणत्या स्मार्टफोनवर तुम्हाला सूट मिळत आहे.नवीन स्मार्टफोन स्वस्तात मिळवायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुम्हाला मोठी सूट मिळत आहे. जुन्या स्मार्टफोनचा कंटाळा आला असेल तर नवीन स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची फ्लिपकार्टवर संधी मिळाली आहे. कॅमरा, रॅम , बॅटरी आणि आता किंमत पण आकर्षक असल्याने तुम्ही या ऑफरकडे दुर्लक्ष करु शकणार नाहीत. फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना नामवंत स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन, शाओमी रेडमी स्मार्टफोन मोठ्या सवलतीत मिळत आहे. कोणते आहेत हे मोबाईल आणि किती मिळत आहे त्यांच्यावर डिस्काऊंट?Apple iPhone 15 चे वेड कमी नाही. अनेक जण या स्मार्टफोनसाठी आग्रही आहेत. पण बजेटमुळे त्यांनी हा स्मार्टफोन खरेदी केलेला नाही. सध्या हा स्मार्टफोन 79,900 रुपयांना आहे. तर फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो खरेदी करता येणार आहे. त्यामुळे Apple iPhone 15 ग्राहकांना 65,999 रुपयांना मिळेल. म्हणजे ग्राहकांना फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 13,901 रुपयांची सूट मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन 54,990 रुपयांना मिळेल. त्यामुळे ग्राहकांना बंपर सूट मिळेल.कंपनीने या नवीन स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ चा 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळतो. ऑफरमध्ये 31,999 रुपयांना हा स्मार्टफोन मिळेल. जर तुम्ही ICICI बँकेच्या कार्डचा वापर करणार असाल तर तुम्हाला झटपट 2,000 रुपयांची सूट मिळेल. तर काही मॉडेलवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरमध्ये या मोबाईलवर 2,000 रुपयांची सूट मिळेल.या आयफोनची किंमत 69,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो उपलब्ध आहे. ग्राहकांना 11,901 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 57,999 रुपयांना मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन अजून स्वस्तात मिळेल. त्यांना या सवलतीसह हा स्मार्टफोन 54,990 रुपयांपर्यंत मिळेल. फ्लिककार्टसह इतर ऑनलॉईन कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पण डिस्काऊंट मिळत आहे. तिथे पण सेल सुरु आहे. ग्राहकांनी सर्व प्लॅटफॉर्मवर किंमती तपासाव्यात. त्यानंतर जिथे अधिक डिस्काऊंट असेल तिथून स्मार्टफोन खरेदी करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -