यंदाचा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असून तो येत्या 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. यंदा अर्थसंकल्पात रेल्वेसाठी नेमकी किती तरदूत असणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. या अर्थसंकल्पानंतर लागलीच लोकसभा निवडणूका घोषीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा अर्थ संकल्प अंतरिम आहे. तर या अंतरिम अर्थ संकल्पात रेल्वेसाठी नेमकी किती तरदूत आहे ते पाहूयात…येत्या एक फेब्रुवारी रोजी सरकार संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणूकीच्या आधी लगोलग सादर केला जात असल्याने याकडे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी विविध योजनांसाठी दहा लाख कोटी रुपयांची तरदूत केली होती. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थ संकल्पाची प्रथा बंद झाली आहे.
तरी रेल्वेसाठी नेमकी किती तरदूत होते याकडे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार रेल्वेवर अधिक लक्ष पुरविणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटी तरदूत केली होती. यंदा रेल्वेसाठी 3 लाख कोटीची तरतूद होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होईल असे म्हटले जात आहे. सरकार रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि आधुनिकीकरणावर भर देत आहे. देशातील पहिल्या सेमी हायस्पीड वंदेभारत रेल्वेने रेल्वे प्रवासाचा वेग वाढला आहे. देशात 34 वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. अयोध्या, भोपाळ, विशाखापट्ट्णम आणि वाराणसी सारख्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करीत आहे. रेल्वे अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी मिशन झिरो अपघात मोहीम राबविणार आहे.