Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रमिठाईच्या दुकानात काम करताना जमिनीवर कोसळला,२५ वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; थरारक

मिठाईच्या दुकानात काम करताना जमिनीवर कोसळला,२५ वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; थरारक

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशातच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मिठाईचा दुकानात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.उत्तर प्रदेशातील आग्राच्या कमला नगरमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा कामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जसवीर उर्फ वीरू असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (ता.२) रोजी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिसते की, काही व्यक्ती आपल्याला एका ठिकाणी उभे असलेले दिसत आहेत तर काही व्यक्ती जमिनीवर बॉक्स पॅकींगचे काम करताना दिसत आहेत.जसवीर ही जमिनीवर बसून काम करत आहे अशातच काही वेळानंतर जसवीर अचानक बसलेल्या ठिकाणावरुन जमिनीवर बेशुद्ध पडतो. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी जसवीर मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया एक्सवरील (ट्वीटर) @priyarajputlive या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ही घटना मन हेलावून टाकणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. याआधी ही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा हार्ट अटॅकचा धोका जाणवत असून चालता- बोलता, जेवण करता करता मृत्यूने गाठल्याच्या घटना घडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -