१ फेब्रवारीला बुध ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे. या बुध गोचरचा फायदा राशीचक्रातील अन्य राशींना होणार आहे. गोचर म्हणजे ग्रहांचे भ्रमण होय. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा इतर राशींवर याचा चांगला किंवा वाईट परिणाम दिसून येतो.बुध ग्रह मकर राशीत प्रवेश केल्यामुळे बुधादित्य राजयोग बनलेला आहे.
सूर्य आधीपासून मकर राशीत असल्यामुळे सूर्य आणि बुधची युती बनली आहे. यालाच बुधादित्य राजयोग म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार बुध गोचरमुळे काही राशींचे नशीब पालटणार आहे. या राशींच्या लोकांना मोठा फायदा होईल. आज आपण बुध गोचरचा कोणत्या राशींना फायदा होईल, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मेष
राशीचक्रातील सर्वात पहिली रास म्हणजे मेष होय. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध गोचरचा लाभ मेष राशीच्या लोकांना होऊ शकतो. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांची खूप प्रगती होईल. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदाराबरोबरचे नाते संबंध दृढ होणार. या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. त्यांना सुख समृद्धी लाभेल.
वृषभ
बुध गोचर वृषभ राशीसाठी अधिक सकारात्मक दिसून येईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. करिअरमध्ये चांगले पद मिळेल. कामाच्या ठिकाणी पगारवाढ सुद्धा होऊ शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांचा मान सन्मान वाढेल. या लोकांना नव्या ठिकाणी नोकरीची ऑफर येऊ शकते. यांना अशी एक संधी मिळू शकते ज्यामुळे त्यांना मोठे यश मिळू शकते आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य पालटू शकते. प्रवासाचे योग जुळून येतील. कुटूंबाबरोबर वेळ घालवू शकाल.
कर्क
बुध ग्रह मकर राशीत प्रवेश केल्यामुळे कर्क राशीला खूप जास्त फायदा होऊ शकतो. यांच्या पगारात वाढ होऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होईल. त्यामुळे आर्थिक वृद्धी होईल. पैशांची कमतरता भासणार नाही. आनंद आणि सुख समृद्धी लाभेल. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होईल.