हक्काचा माणूस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे (Shiv Thakare). बिग बॉस मराठी २ (Bigg Boss Marathi 2) चा विजेता ठरलेला शिव मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे.’बिग बॉस १६’ (Bigg Boss 16), खतरों के खिलाडी (Khataron Ke Khiladi) अशा कितीतरी गाजलेल्या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता मर्यादित राहिलेली नाही. नुकताच तो झलक दिखला जा ११मध्ये पाहायला मिळाला. या शोमुळे तो चर्चेत होता. मात्र आता तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याची अवस्था पाहून चाहते चितेंत पडले आहेत. या व्हिडीओत तो रस्त्यावर भीक मागताना दिसतो आहे.
शिव ठाकरेचा सोशल मीडियावर व्हिडीओ पाहायला मिळतो आहे, त्यात तो प्रोस्थेटिक मेकअप करताना दिसतो आहे. त्यात टक्कल, चेहऱ्यावर मोठे मोठे फोड असा एकदम विद्रुप अवतारात दिसत आहे. अशा अवतारात तो रस्त्यावर लोकांकडे भीक मागताना दिसत आहे. भीक मागताना काहींनी त्याला हटकलं तर कुणी घाबरलं. मात्र एका रिक्षावाल्या काकांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला पैसे दिले.मराठमोळ्या रिक्षावाल्यानं जिंकलं नेटकऱ्यांचं मन
खरेतर त्याने हा प्रँक केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्यातल्या एका युजरने लिहिले की, रिक्षावाल्या काकांनी मन जिंकले. दुसऱ्या युजरने लिहिले की, मराठी माणसाच मन खूप मोठ असतं…तर आणखी एकाने म्हटले की, मराठी माणूस नेहमी मदतीला धावून येतो. तर एकाने लिहिले की, मराठी माणूस आहे त्यांनी पैसे दिले ते खूप दिलदार आहेत ओ मराठी माणसा.