Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगलग्न करणार का? 'ति'ने प्रपोज करताच सलमान खानने दिले उत्तर

लग्न करणार का? ‘ति’ने प्रपोज करताच सलमान खानने दिले उत्तर

-टाउनचा मोस्ट एलिजिबल बॅचलर अभिनेता सलमान खानच्या आयुष्यात अनेक मुली आल्या असतील, पण 58 वर्षीय दबंग खान अजूनही बॅचलर आहे. यापूर्वी त्यांचे नाव ऐश्वर्या राय बच्चनपासून कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.त्याचे चाहते नेहमीच भाईजान लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत असतात. अशात आता सलमान खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हॉलिवूडमधील एक पत्रकार त्याला लग्नाचा प्रस्ताव देताना दिसत आहे. मात्र, नंतर सलमान खानने ही ऑफर नाकारली.हा व्हिडिओ सलमान खान अबुधाबीतील एका खासगी कार्यक्रमातील आहे. यावेळी सलमान खानने मीडियाचीही भेट घेतली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘महिला पत्रकाराने त्याच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली,मी हॉलिवूडहून आले आहे, फक्त तुला एक प्रश्न विचारण्यासाठी मी तुझ्या प्रेमात पडली आहे.’

यावर सलमान खान म्हणतो,’तुम्ही शाहरुख खानबद्दल बोलताय ना? सलमानचे म्हणणे ऐकून ती महिला म्हणाली,नाही, मी सलमान खान तुझ्याबद्दल बोलत आहे. तू माझ्याशी लग्न करशील का?” याला उत्तर देताना सलमान म्हणतो, “माझ्या लग्नाचे दिवस गेले आहेत. तुला 20 वर्षांपूर्वी भेटायला हवं होतं.” आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमान खान सध्या युलिया वंतूरला डेट करत असल्याची चर्चा आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये सलमानने कबूल केले होते की, त्याला संगीता बिजलानीसोबत लग्न करायचे होते, पण काही घडले नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती आणि इतकेच नाही तर ती कार्टमध्ये छापण्यात आली होती. अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘टायगर वर्सेस पठाण’मध्ये दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -