Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगHDFC बँकेच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज, EMI आणि कर्जाचे हप्ते वाढणार

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज, EMI आणि कर्जाचे हप्ते वाढणार

एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या लोकांना फटका बसणार आहे. कारण बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. ज्या लोकांनी या बँकेकडून कर्ज घेतले आहे अशा लोकांचा इएमआय आणि हप्ता वाढणार आहे. बँकेने किती टक्क्यांनी वाढ केली आहे जाणून घ्या.HDFC बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने MCLR च्या सीमांत खर्चात 0.10 टक्क्याने वाढ केली आहे. हे नवे दर 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. बँकेने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

MCLR हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँका त्यांच्या ग्राहकांना कर्ज देतात. HDFC बँकेचा MCLR 8.90 टक्के ते 9.35 टक्के दरम्यान आहे. आता तो MCLR 8.80 टक्क्यांवरून 8.90 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्याचा MCLR 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा MCLR 9 टक्क्यांवरून 9.10 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा MCLR 9.30 टक्के करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहकांना लागू असलेला एक वर्षाचा MCLR ९.२५ टक्क्यांवरून ९.३० टक्के करण्यात आला आहे. 3 वर्षांचा MCLR 9.35 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

1. कर्जाच्या खर्चात वाढ

MCLR वाढल्यामुळे कर्जाचे व्याजदरही वाढणार आहेत. त्यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक व्याज द्यावे लागणार आहे. यामुळे मासिक हप्ते वाढतील. नवीन कर्ज घेणे महागणार आहे.

2. नवीन कर्ज घेणे कठीण होते

वाढलेल्या व्याजदरामुळे ज्यांना कर्ज घ्यायचे आहे त्यांना कर्ज घेणे कठीण होऊन जाते. क्रेडिट स्कोअर किंवा उत्पन्न कमी असेल अशा लोकांना लोन घेताना अडचणी येतात.

3. घरगुती खर्चावर परिणाम

MCLR वाढला की, मग कर्जाची किंमत देखील वाढते. त्यामुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी कमी पैसे राहतात. यामुळे घरातील खर्चावर नियंत्रण आणावे लागते.

MCLR वाढल्याने बँकांच्या नफ्यात वाढ होते. MCLR वाढल्यामुळे सरकारचा कर महसूल देखील वाढू शकतो. याचा अर्थ सार्वजनिक सेवांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे अधिक पैसे येतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -