बक्षिसपत्राने मिळालेल्या मिळकतीच्या सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी अमोल जाधव याला आज इचलकरंजी येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
इचलकरंजी येथील तलाठी अमोल जाधव यांच्याकडे बक्षीस पत्राने मिळालेल्या जागेची नोंद सातबारा पत्रकी करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. अनेक दिवस हेलपाटे मारून ही तलाठी जाधव यांनी सातबारा पत्रिके नाव नोंद केली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी तलाठी जाधव यांची भेट घेऊन बक्षीस पत्रानुसार सातबारा पत्रिके नाव नोंद करण्याची विनंती केली असता जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे नाव नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयाची मागणी केली होती.
तडजोडीअंती चार हजार रुपयांच्या मोबदल्यात सातबारा पत्रकी नाव नोंदण्याचे आश्वासन तलाठी जाधव यांनी दिले होते त्यामुळे तक्रारदार यांनी कोल्हापूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी सापळा रचून तलाठी जाधव याला चार हजार रुपयाची लच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.याबाबतची नोंद इचलकरंजी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती.
ट्रॅक्टरसाठी आता 5 लाखांचे अनुदान! असा करा अर्ज :Tractor Anudan Yojana
आरोपी तलाठी जाधव यास न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणातील या कारवाईमध्ये पो.नि. आसमा मुल्ला, कर्मचारी प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, विष्णू गुरव, सुरज अपराध यांनी सहभाग घेतला होता होता.
राशिभविष्य : शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी 2024 : Horscope Today