Sunday, December 22, 2024
HomeBlogबँक ऑफ बडोदा देत आहे 20 ते 25 लाख पर्सनल लोन :...

बँक ऑफ बडोदा देत आहे 20 ते 25 लाख पर्सनल लोन : BOB Personal Loan

पैसे ही जीवन जगण्यासाठी आवश्यक अशी गोष्ट असून जीवन जगण्याचे एक साधन आहे. आयुष्यामध्ये जगत असताना केव्हा कोणती गरज किंवा कोणती घटना घडेल हे आपल्याला सांगता येत नाही.BOB Personal Loan:-

त्यामुळे बऱ्याचदा अचानक आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व प्रत्येक वेळी आपल्याकडे हवा तितका पैसा नसतो. तेव्हा बरेच जण मित्र किंवा नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतात व काहीजण बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनचा पर्याय स्वीकारतात.

बँकांच्या माध्यमातून दिला जाणाऱ्या पर्सनल लोनचा विचार केला तर प्रत्येक बँक पर्सनल लोन सुविधा पुरवते. परंतु प्रत्येक बँकेचा यासंबंधीचा क्रायटेरिया वेगवेगळा असतो व आपल्याला तो माहीत असणे देखील तितकेच गरजेचे असते. कागदपत्रे तसेच पर्सनल लोन कालावधी, असणारी पात्रता इत्यादी गोष्टींची माहिती असणे तुम्हाला गरजेचे असते. Personal Loan

मोठी बातमी! जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार; मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रम

याच अनुषंगाने जर आपण बँक ऑफ बडोदाचा विचार केला तर तुम्हाला आलेल्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून वीस ते पंचवीस लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. परंतु साहजिकच त्याकरिता तुम्हाला बँकेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे देखील तितकेच गरजेचे असते. Personal Loan

या अनुषंगाने आपण या लेखामध्ये बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन घ्यायचे तर ते कसे घ्यावे लागते व त्यासाठी कोणता आवश्यक क्रायटेरिया लागतो? या बद्दलची माहिती घेणार आहोत.

बँक ऑफ बडोदा देईल 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन  Personal Loan

आर्थिक अडचणीच्या वेळेस तुम्हाला बँक ऑफ बडोदा कडून साधारणपणे 20 ते 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सुविधा मिळते. साधारणपणे या दिल्या जाणाऱ्या पर्सनल लोन वर किमान 10.26% आणि जास्तीत जास्त 17.60% पर्यंत व्याजदर आकारला जातो.

शॉर्टटर्म गुंतवणुकीत भरघोस परताव्याची संधी; तज्ज्ञांनी सूचवले 10 शेअर्स : मिळेल फायदाच फायदा : Share Market

बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून पेन्शनर लोकांसाठी देखील पर्सनल लोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून अशा पेन्शनर खातेधारकांना वार्षिक 11.35 टक्क्याच्या पुढे व्याजदर आकारला जातो. जर आपण बँक ऑफ बडोदा कडून दिल्या जाणाऱ्या पर्सनल लोन परतफेडीचा कालावधी पाहिला तर तो सात ते आठ वर्षाचा असतो.

किती लागते प्रक्रिया शुल्क?

बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पर्सनल लोनच्या एकूण रकमेच्या दोन टक्के इतकी प्रोसेसिंग फी चार्ज केली जाते. म्हणजेच किमान एक हजार ते दहा हजार अधिक जीएसटी प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागते. परंतु बँक ऑफ बडोदामध्ये जर पगार खाते असेल तर अशा सरकारी कर्मचाऱ्यांना शून्य प्रोसेसिंग फी म्हणजे कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही.

बँक ऑफ बडोदा फोरक्लोजर शुल्क किती आकारते?

फोर क्लोजर शुल्क म्हणजे समजा बँकेकडून आपण एक वर्षासाठी पर्सनल लोन घेतले आहे व ते आपल्याला पाच ते सहा महिने झाल्यानंतर बँकेला परत करायचे आहे.

शेतकऱ्यांना मिळणार अनुदान ; मंत्रिमंडळ बैठकीत नवा निर्णय! Big Financial News for Farmer

तर अशावेळी बँक आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नसते व त्यालाच फोर क्लोजर चार्ज असे म्हणतात. परंतु काही बँका अशा प्रकारचा चार्ज घेतात.परंतु बँक ऑफ बडोदा मध्ये कुठल्याही प्रकारचे फोर क्लोजर शुल्क आकारले जात नाही.

बँक ऑफ बडोदा पर्सनल लोनचे प्रकार

1- बडोदा पर्सनल लोन– या प्रकारचे लोन हे तुम्हाला जोखमीने भरलेले काम सोडून इतर कुठल्याही कामाकरिता दिले जाते. या प्रकारचे पर्सनल लोन मेट्रो आणि शहरींना जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत आणि निम शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना कमाल 15 लाख इतके दिले जाते.

तसेच बडोदा पर्सनल लोनची कमीत कमी मर्यादा पाहिली तर ती शहरी भागातील लोकांना कमीत कमी एक लाख तर निमशहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना कमीत कमी 50 हजारापर्यंत दिले जाते. या प्रकारचे पर्सनल लोनचा कालावधी हा 48 महिन्याचा तर कमाल 60 महिने इतका असतो.

Paytm वरून मिळवा कुठल्याही गॅरंटीशिवाय २ मिनिटात २ लाखांपर्यंत कर्ज (instant Personal Loan 2024)

2- पेन्शनधारकांसाठी बडोदा पर्सनल लोन– या प्रकारचे लोन निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याकरिता दिली जाते. या प्रकारच्या लोनवर 11.35% इतका व्याजदर आकारला जातो.

3- प्री अप्रूव्ह पर्सनल लोन– हे लोन कोविड 19 मुळे उद्भवलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरता बँक ऑफ बडोदा कडून दिले जाते. या प्रकारच्या पर्सनल लोनमध्ये कर्जाची किमान मर्यादा पाच लाख रुपये इतकी आहे व हे लोन पाच ते सहा वर्ष कालावधी करता दिले जाते. यावर एकूण रकमेच्या 11.50% इतका व्याजदर आकारला जातो.

बँक ऑफ बडोदा पर्सनल लोनसाठी पात्रतेच्या अटी : Personal Loan

1- अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे असावे.

2- नोकरदार व्यक्ती असेल तर कमाल वय 60 आणि नोकरी न करणाऱ्यांचे कमाल वय 65 असणे गरजेचे आहे.

वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठीचा विविध समितींचा अहवाल आमदार आवाडे यांनी केला सुपूर्द : वाचा सविस्तर : Textile Buisness

3- कर्जाकरिता अर्ज करणारा अर्जदार हा सरकारी संस्था तसेच खाजगी कंपनीमधील कर्मचारी असावा व त्याला किमान एक वर्षापासून त्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव किंवा तो त्या ठिकाणी काम करत असावा.

4- प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच प्रोप्रायटरशिप फर्म, ट्रस्ट आणि पार्टनरशिप फर्मचा कर्मचारी यांना किमान एक वर्षाचा त्या त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा.

5- स्व:रोजगार असलेली व्यक्ती असेल तर त्याचा व्यवसाय किमान एक वर्ष जुना असावा व तो चालू स्थितीत असावा.

बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Personal Loan

ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज दोन फोटो, बँकेचे पासबुक, बँकेचे सहा महिन्याचे मागील स्टेटमेंट, पगारदार व्यक्तींचे सहा महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट आणि तीन महिन्याची सॅलरी स्लिप,

बँकेमध्ये सोने ठेवताय ? 100 ग्रॅम सोन्यावर बँक किती व्याज देते बघा : Gold Loan

व्यावसायिकांसाठी मागील एक वर्षाची इन्कम टॅक्स रिटर्न, मागिल एक वर्षाचे प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट यासोबतच इन्कम टॅक्स चलन / क्लीअरन्स सर्टिफिकेट/ आयटी मूल्यांकन/ टीडीएस प्रमाणपत्र( फॉर्म 16A/ फॉर्म 26AS, उद्योग व्यवसायाचा पुरावा म्हणून व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र

आणि सेवा कर नोंदणी इत्यादी, तसेच काम करत असलेल्या कंपनीने जारी केलेला कर्मचारी आयडी, प्रॅक्टिस सर्टिफिकेट आणि CFAI, ICAI, ICWA सारख्या व्यवसायिक संस्थांनी जारी केलेले ओळख कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे यासाठी आवश्यक असतात. Personal Loan

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा. 2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Personal Loan

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -