RBI ने धडक कारवाई केली. तपासात अनेक कारनामे समोर आले. त्यानंतर पेटीएम संदर्भात अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अर्थात पेटीएमने त्यांची बाजू स्पष्ट केली. युपीआय पेमेंटवर बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे.पण तरीही या प्रकारामुळे सरकार अलर्ट झाले आहे. हा प्रकार केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला आहे. बाजारात इतर पण ॲप आहेत. त्याचा पण थेट फायदा ग्राहकांना घेता येणार आहे. पण सरकार याविषयी ठोस धोरण आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
युपीआय मार्केटचा बादशाह कोण?
काही दिवसांपूर्वी एक अहवाल समोर आला होता. त्यात गुगल पे आणि फोन पे हे युपीआय मार्केटमध्ये अग्रेसर असल्याचा दावा करण्यात आला होता. सध्याच्या पेटीएम संकटाचा या दोन्ही ॲपला 15-20% फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशात UPI मार्केट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा भारतीय ॲपला फायदा होण्यासाठी सरकार ठोस धोरण आखत आहे. भारतीय ॲपचा वापर वाढविण्यासाठी ‘Make In India’ वर जोर देण्यात येणार आहे.
युपीआयचा कुठे आहे BHIM?
सध्या देशात सर्वाधिक वापरकर्ते Phone Pay चे आहेत. त्यानंतर Google Pay चा क्रमांक लागतो. तर भारतीय ॲप BHIM UPI याबाबतीत सर्वात पिछाडीवर आहे. केंद्र सरकारसाठी हे फार मोठे आव्हान आहे. दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे. आता BHIM UPI ने पण ऑफरचा वर्षाव केलाआहे. या ॲपमध्ये पण अनेक बदल करण्यात आले आहे. ते युझर्स फ्रेंडली करण्यावर जोर देण्यात येत आहे.
UPI मध्ये ठरणार BHIM
UPI हा सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यात BHIM या स्वदेशी ॲपला आघाडी घेता आली नाही. ते पिछाडीवर पडले. पेटीएमच्या कारनाम्यामुळे आता सरकारने देशी ॲपला प्राधान्य देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी ‘Make In India’ वर जोर देण्यात येणार आहे. भीम युपीआयवर पण मोठ्या ऑफर्स देण्यात येतील. तसेच काही धोरणात्मक बदल करुन या ॲपला पुढे आणण्यात येईल. BHIM App चे युझर वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.