Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशलाईव्ह मॅचमध्ये अंगावर वीज कोसळून खेळाडूचा मृत्यू, थरकाप उडवणारा Video

लाईव्ह मॅचमध्ये अंगावर वीज कोसळून खेळाडूचा मृत्यू, थरकाप उडवणारा Video

क्रीडा विश्वातून अंत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईव्ह सामन्यावेळी खेळाडूच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी ही घटन घडली होती, वीज पडलेल्या खेळाडूला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं होतं. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती समजत आहे. अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Navi अँपमधून ₹20,00,000 पर्यंत मोबाईलवर लोन मिळवा काही मिनटात! असा करा अर्ज
नेमकं काय घडलं?

इंडोनेशियामध्ये पश्चिम जावामधील एफबीआय सुबांग आणि एफसी बांडुंग या दोन संघांमध्ये फुटबॉल सामना सुरू होता. व्हिडीओमध्य दिसत आहे की, फुटबॉल सामना सुरू असून खेळाडू त्याच्याकडे बॉल येण्याची वाट पाहत होता. मात्र त्यावेळी अचानक त्या खेळाडूच्या अंगावर वीज पडली. वीजेच्या धक्क्याने तो खेळाडू जाग्यावरच पडलेला दिसला. मैदानातील इतर खेळाडू प्रचंड घाबरलेले दिसले.

Personal loan : मोबाईलद्वारे मिळवा 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज

ज्या खेळाडूच्या अंगावर वीज पडली त्याच्याजवळ इतरही खेळाडू पोहोचलेले दिसले. काही खेळाडू वीजेच्या आवाजाने मैदानाच्या बाहेर पळून जाताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असून जाग्यावरच खेळाडूचा मृत्यू झाल्याने नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या पैसे कमावण्याचे मार्ग | How To Earn Money Online In Marathi

दरम्यान, फुटबॉल सामना सुरू असताना वीज पडण्याची ही काह पहिलीच वेळ नाही. याआधी सोरिटिन अंडर-13 चषकावेळी पूर्व जावामध्ये एका युवा खेळाडूच्या अंगावर वीज कोसळली होती. मात्र त्याला वेळेत रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. डिसेंबर 2023 ला ब्राझीलमध्ये फुटबॉल सामन्यावेळी वीज कोसळून एक खेळाडूचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. तर सहा जण जखमी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -