इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून मुंबईकर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी पदार्पण केलं. कॅप्टन रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर सरफराज खान बॅटिंगसाठी मैदानात आला. सरफराजने आपली प्रतिभा दाखवून दिली. सरफराजने पदार्पणातच अर्धशतकी खेळी करुन आपली छाप सोडली, तसेच गेल्या अनेक वर्षांची मेहनत सार्थ ठरवली.
सरफराज अर्धशतकानंतर आणखी जबरदस्त खेळत होता. पण त्याच्यासोबत असलेला टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्या चुकीच्या कॉलमुळे सरफराजच्या खेळीचा द एन्ड झाला. जडेजाच्या कॉलमुळे सरफराज रन आऊट झाला.
सरफराजला 64 धावांवर परतावं लागलं. सरफराजला रन आऊट केल्याने जडेजावर खूप टीका झाली. मात्र जडेजासोबत नियतीनेही तसंच केलं. दुसऱ्या दिवसाच्या खेळासाठी टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवी ही जोडी मैदानात आली. मात्र काही ओव्हरनंतर कुलदीपनंतर जडेजा आऊट झाला. जडेजा ज्या पद्धतीने आऊट झाला, ते पाहून नियतीने सरफराजला रन आऊट केल्याचा वचपा जडेजाकडून घेतला, असं नेटकरी म्हणत आहेत.
नक्की काय झालं?
कुलदीप-जडेजा जोडीने 5 बाद 326 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी 86 षटकांचा खेळ झाला. मात्र इंग्लंडने चौथ्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवली.जेम्स एंडरसन याने कुलदीप यादवला जेम्स फोक्स याच्या हाती 4 धावांवर कॅच आऊट केलं. कुलदीपनंतर ध्रुव जुरेल मैदानात आला. जो रुट टीम इंडियाच्या डावातील 90 वी ओव्हर टाकायला आला.
जो रुट याच्या या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर जडेजाने पायावर कुऱ्हाड मारली. जडेजाने आपली विकेट रुटला गिफ्टमध्ये दिली. जडेजाने रुटच्या बॉलिंगवर कॉट एन्ड बोल्ड झाला. म्हणजेच रुटने आपल्या बॉलिंगवरच जडेजाला कॅच आऊट केलं. जो रुटची या मालिकेत जडेजाला आऊट करण्याची ही दुसरी वेळ ठरली. जडेजाने 225 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 112 धावांची खेळी केली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.