Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्यमहाशिवरात्रीनंतर ६ दिवसांनी ‘या’ राशींच्या मंडळींना होणार बक्कळ धनलाभ? ‘बुधादित्य योग’ बनल्याने...

महाशिवरात्रीनंतर ६ दिवसांनी ‘या’ राशींच्या मंडळींना होणार बक्कळ धनलाभ? ‘बुधादित्य योग’ बनल्याने दारी येईल लक्ष्मी!

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. आता येत्या ७ मार्चला सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी ग्रहांचा राजकुमार बुधदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर १४ मार्चला ग्रहांचा राजा सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे बुधदेवाची आणि सूर्यदेवाची युती मीन राशीत होणार आहे.

ज्यामळे ‘बुधादित्य योग’ निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधादित्य योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना अपार यश, सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया बुधादित्य योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

 

‘या’ राशींचे बँक बॅलेन्स वाढणार?

वृषभ राशी

या राशीच्या अकराव्या भावात बुधादित्य योग निर्माण होत आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांंना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीचे लोक मालमत्ता किंवा जमीन खरेदी करु शकतात. अविवाहित लोकांचे लग्न ठरु शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहू शकतो.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांना बुधादित्य योग बनल्याने सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. हा शुभ योग या राशीच्या दहाव्या भावात घडत असल्याने या राशीच्या लोकांना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणार्‍यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांना या काळात भरपूर नफा मिळू शकतो. या राशीचे लोक काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकतात.

 

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग वरदानच ठरु शकतो. हा योग या राशीच्या सातव्या भावात निर्माण होत आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. राजयोगाच्या निर्मितीने या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात मोठा धनलाभ होऊ शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -