Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाAkash Deep पदार्पणात ठरला दुर्देवी, इंग्लंड विरुद्ध काय झालं?

Akash Deep पदार्पणात ठरला दुर्देवी, इंग्लंड विरुद्ध काय झालं?

आकाश दीप याने रांचीत इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. आकाश दीप या बॉलिंग ऑलराउंडरला जसप्रीत बुमराह याच्या जागी संधी देण्यात आली.आकाश दीप हा टीम इंडियाकडून 313 वा भारतीय ठरला. आकाश दीप याला टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी कॅप देऊन अभिनंदन केलं.

आकाश दीपला टेस्ट कॅप मिळाल्यानंतर त्याने त्याच्या आईला घट्ट मिठी मारली. त्यावेळेस आकाश दीपचे कुटुंबियही मैदानात हजर होते.आकाश दीप हा इंग्लंड विरुद्धच्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणारा चौथा भारतीय ठरला.

त्याआधी रजत पाटीदार, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या तिघांनी पदार्पण केलं.आकाश दीपने आपल्या कसोटी कारकीर्दीची शानदार सुरुवात केली. आकाश दीपने आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर झॅक क्रॉली याचा स्टंप उडवत पहिली विकेट मिळवली. पण आकाश दुर्देवी ठरला.आकाश दीपने टाकलेला बॉल नो बॉल होता. त्यामुळे झॅक क्रॉली वाचला. अंपायरने नो बॉल दिला आणि आकाश दीपला पहिल्या विकेटवर पाणी सोडावं लागलं. आकाश दीप अशाप्रकारे दुर्देवी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -