Thursday, December 26, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी-सांगली मार्गावर बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी, नोकरदारांना फटका, एसटीचे नियोजन कोलमडले

इचलकरंजी-सांगली मार्गावर बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी, नोकरदारांना फटका, एसटीचे नियोजन कोलमडले

इचलकरंजी-सांगली मार्गावर एकाचवेळी एकामागून एक धावणाऱ्या, तर निवडकवेळी तासभर वाट पाहायला लावणारी तसेच थांबे सोडून लांबवर थांबणारी अशी ओरड एसटी गाड्यांबाबत वाढत आहे.कितीही तक्रारी केल्या, तरी एसटीचे नियोजन प्रवाशांना गैरसोय ठरत आहे. यामुळे वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, असे म्हणणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसटी आगाराचे असे विस्कळीत वेळापत्रक प्रत्येक मार्गावर प्रवाशांना अनुभवायला मिळत आहे.

प्रत्येक मार्गावर एसटीला प्रवाशांची गर्दी कायम आहे. त्यानुसार गाड्यांचे वेळापत्रक ठरवणे क्रमप्राप्त आहे. मात्र इचलकरंजी शहरात ये-जा करणाऱ्या गाड्यांचे नियोजन कोलमडल्याचे दिसत आहे. सकाळच्या सत्रात गर्दी नसताना एसटी गाड्या एकामागून एक धावत आहेत. इचलकरंजीकडून सांगली, मिरज मार्गावर, तर मिरज, सांगलीवरून गाड्यांची ही स्थिती आहे. तसेच ग्रामीण भागातही परिस्थिती फार वेगळी नाही. याचा फटका विद्यार्थी, नोकरदार प्रवाशांना बसत आहे.

सकाळी साडेनऊनंतर मार्गावर गाड्यांचे नियोजन कोलमडत आहे. वेळेत गाड्या येत नसून, आल्या तर निश्चित थांब्यावर थांबत नाहीत. यावेळेत विद्यार्थ्यांची गर्दी असल्याने एसटी तुडुंब भरलेली असते. अशावेळी एसटीची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.

पासधारक विद्यार्थ्यांची अधिक कुचंबणा होत आहे.एसटी पूर्वपदावर आली, तरी एसटीचे नियोजन मात्र पूर्वपदावर आले नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्या मार्गावर प्रवाशांची गर्दी, कोणत्या वेळी अधिक आहे, त्यानुसार आता एसटी गाड्यांचे वेळापत्रक करणे गरजेचे आहे. तरच प्रवाशांची गैरसोय टळेल आणि आगारालाही फायदेशीर ठरेल.

विद्यार्थ्यांचा धोक्याचा प्रवास

एसटी वेळेत आली नाही, तर शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची धांदल सुरू होते. अशावेळी विद्यार्थी रस्त्याकडेला थांबतात आणि गाडीला हात करून शाळेत जायचा प्रयत्न करतात. मात्र हे विद्यार्थ्यांना फार धोक्याचे आहे. शहराला जोडणाऱ्या प्रत्येक मार्गावर विद्यार्थ्यांचा हा धोक्याचा प्रवास पाहायला मिळतो.

आगार-आगारांत समन्वय हवा

शहरात सांगली, मिरज, जयसिंगपूर, कोल्हापूर, कुरुंदवाड आगारांतून एसटी बसेस शहरात येतात. या आगारातील एसटी गाड्यांबाबत प्रवाशांच्या अडचणी आहेत. या तक्रारी इचलकरंजी आगारात केल्या जातात. अशावेळी इचलकरंजी आगाराने इतर आगारांशी समन्वय ठेवून अडचणी सोडवण्याबाबत प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.प्रवाशांची गर्दी आणि प्रतिसादानुसार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात येते.

गाड्यांची कमतरता असून, मागणीनुसार एसटी फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल. अन्य अगारांशी चर्चा करून वेळापत्रकात सुधारणा होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -