रांची टेस्टमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 5 विकेटने हरवून सीरीज जिंकली. पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने पुढचे तिन्ही सामने जिंकून मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली. ही आघाडी घेतानाच शुभमन गिलने असं काही करुन दाखवलय की, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सारख्या दिग्गजांच्या तो पुढे निघून गेलाय.
रांची टेस्ट टीम इंडियाने जिंकली. पहिल्या डावात पिछाडीवर पडूनही टीम इंडियाने रांची कसोटी 5 विकेटने जिंकली. हा विजय खूप खास आहे. कारण टीम इंडियाने टॉस गमावला होता. पीचवर फलंदाजी करणं सोप नव्हतं. त्याशिवाय इंग्लंडकडे आघाडी होती. महत्त्वाच म्हणजे टीमकडे अनुभवी फलंदाजांची कमतरता होती.
मात्र, तरीही मॅच टीम इंडियाने आरामात जिंकली. टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 90 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 39 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी एका फलंदाजाने कमालीची बॅटिंग केली. त्याने टीम इंडियाच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. रांची टेस्टमध्ये शुभमन गिलने नाबाद 53 धावा केल्या.
आपल्या या इनिंगमध्ये शुभमन गिलने असं काही केलं की, ज्यावर विश्वास ठेवणं बऱ्याच जणांसाठी कठीण जाईल.शुभमन गिलने दुसऱ्या डावात नाबाद 53 धावा करताना 210 धावांचा एक खास आकडा गाठला. गिलने आपल्या करिअरमध्ये जिंकलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या इनिंगमध्ये 210 धावा केल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल विराट, रोहित, रहाणे, गंभीरसारख्या खेळाडूंनी सुद्धा संपूर्ण करिअरमध्ये जिंकलेल्या कसोटी सामन्यात चौथ्या इनिंगमध्ये इतक्या धावा केलेल्या नाहीत. गिल या सगळ्या दिग्गजांच्या पुढे निघून गेलाय.
गिलने सिद्ध केलं की….जगतील कुठल्याही फलंदाजाला विचारा, कसोटी क्रिकेटमध्ये धावा बनवताना सर्वात जास्त अडचण केव्हा येते?. सगळ्यांच एकच उत्तर असेल, कसोटीच्या दुसऱ्याडावात. पण गिलने इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये दुसऱ्याडावातच कमालीची बॅटिंग केलीय.
गिलने या टेस्ट सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये शानदार शतक झळकावलं. विशाखापट्टनममध्ये त्याने 104 धावा केल्या. राजकोट टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 91 धावा केल्या. आता रांची टेस्टच्या दुसऱ्याडावात या खेळाडूने नाबाद 52 धावा केल्या. म्हणजे गिलने या सीरीजच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 247 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 61 पेक्षा जास्त आहे. शुभमन गिलने सिद्ध केलय, कठीण काळात तो ढेपाळत नाही, तर अजून प्रखरतेने खेळतो.