- गेल्या आठवड्यात सोने-चांदीत चढउताराचे सत्र होते. प्रत्येक दिवशी भाव बदलत होता. आठवड्याच्या शेवटी सुद्धा हाच ट्रेंड कायम होता. सोने-चांदीतील या बदलामुळे ग्राहकांना संमिश्र अनुभव येत होता. गेल्या आठवड्याच्या शेवटी सोने 200 रुपयांनी तर चांदी 400 रुपयांनी महागली होती. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यात घसरण झाली. आता स्वस्ताईमुळे ग्राहकांना खरेदीची संधी आहे. अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमतीसोने झाले स्वस्त
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती प्रत्येक दिवशी बदलत होत्या. 21 फेब्रुवारीला सोने 250 रुपयांनी महागले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले. काल भावात अपडेट दिसली नाही. 24 फेब्रुवारी रोजी त्यात 200 रुपयांची वाढ झाली होती. तर 26 फेब्रुवारी रोजी किंमती 160 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.ग्राहकांची झाली चांदी
गेल्या आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी स्वस्त झाली होती. 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. तर आता 22 फेब्रुवारी रोजी 700 आणि 23 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची पडझड झाली. 24 फेब्रुवारीला किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्यात सुरुवातीलाच 400 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने किंचित वधारले आणि चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 62,224 रुपये, 23 कॅरेट 61,975 रुपये, 22 कॅरेट सोने 56,997 रुपये झाले. 18 कॅरेट 46,668 रुपये, 14 कॅरेट सोने 36,401 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,449 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.