Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगशेअर बाजारात संमिश्र व्यवसायाचे संकेत; ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष

शेअर बाजारात संमिश्र व्यवसायाचे संकेत; ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष

मंगळवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स वाढीसह बंद झाले. शेवटी बीएसई सेन्सेक्स(stock) 305.09 अंकांच्या अर्थात 0.42 टक्क्यांच्या वाढीसह 73,095.22 वर बंद झाला आणि निफ्टी 76.30 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 22,198.30 वर बंद झाला.

निफ्टी(stock) मंगळवारी घसरणीसह उघडला पण नंतर तो सुधारला आणि दिवसाचा शेवट हिरव्या चिन्हाने झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. डेली चार्टवर, निफ्टी 22100 – 22070 चा सपोर्ट झोनवर कायम आहे. एकूणच, निफ्टी गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून मोठ्या रेंजमध्ये (21900 – 22300) कंसोलिडेट होत आहे.

बोलिंजर बँड अरुंद होत आहेत, हे बाजार एका रेंजमध्ये फिरत असल्याचे संकेत आहेत. आवर्ली मोमेंटम इंडिकेटरने पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर सुरू केला आहे, हे देखील तेजीचे संकेत आहे. अशा स्थितीत इंट्राडे डिपमध्ये खरेदी होण्याची शक्यता आहे. तर खाली 21900 वर निफ्टीला मोठा सपोर्ट आहे.

तर 22300 वर रझिस्टंस आहे.जोपर्यंत बँक निफ्टीचा संबंध आहे, तो 46300 – 47400 च्या रेंजमध्ये फिरत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात ते 40 दिवसांच्या एव्हरेजवर (46300) राहिला आणि बाउन्स बॅक झाला. पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये अपट्रेंड सुरू ठेवण्याची आशा आहे. तर वरच्या बाजूस 47000 वर रझिस्टंस आहे आणि पुढील रझिस्टंस 47200 वर दिसत आहे.

दोन दिवसांच्या कमजोरीनंतर निफ्टीने बुलिश एनगल्फिंग पॅटर्न केल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. याशिवाय, निफ्टी शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेजवर राहिल्याने ट्रेंड सकारात्मक आहे.

एकंदरीत, निफ्टी मागील कंसोलिडेशनच्या उच्च पातळीच्या वर बंद झाल्याने बाजारावरील बुल्सचे नियंत्रण कायम राहू शकते. जर निफ्टी 22,200 च्या वर गेला तर आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये 22,400 पर्यंत चांगली तेजी दिसून येईल. निफ्टीला खाली 22000 वर सपोर्ट आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

टीसीएस (TCS)

पॉवरग्रीड (POWERGRID)

इंडसइंड बँक (INDUSINDBK)

सनफार्मा (SUNPHARMA)

व्होल्टास (VOLTAS)

फेडरल बँक (FEDERALBNK)

इंडियन हॉटेल (INDHOTEL)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद – शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -