Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीगौतमी पाटील हिला भाजप निवडणुकीचं तिकीट देणार? सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्र्यांवरच...

गौतमी पाटील हिला भाजप निवडणुकीचं तिकीट देणार? सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्र्यांवरच डागली तोफ

लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये विविध पक्षातील बड्या नेत्याचे भेटीगाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून होत आहे. यावेळी ठाकरे गटाच्या मुक्त संवाद दौऱ्याप्रसंगी भाजप खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांनी भिंवडीत जाऊन जोरदार हल्लाबोल केला.आगामी लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा मुक्त संवाद दौरा सुरु आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर तोफ डागली. दरम्यान, लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये विविध पक्षातील बड्या नेत्याचे भेटीगाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून होत आहे.

यावेळी ठाकरे गटाच्या मुक्त संवाद दौऱ्याप्रसंगी भाजप खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांनी भिंवडीत जाऊन जोरदार हल्लाबोल केला. संवाद दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे म्हणाल्या, कपिल पाटील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. कपिल पाटील यांची शहापुरात सभा असल्याने गर्दी जमणार नाही म्हणून ते गौतमी पाटील यांना खास गर्दी जमवण्यासाठी घेऊन येत आहेत. जर गौतमी पाटीलमुळे लोक जमत असतील तर त्यांनी निवडणुकीचं तिकीट गौतमी पाटील हिलाच द्यावं, असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -