कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून प्रियांश कन्सलटन्सी(ad fraud) या कंपनीने गुंतवणूकदारांची १ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत संग्राम शिवाजी पाटील (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी बुधवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कंपनीचे प्रमुख प्रमोद आनंदा कांबळे आणि प्रवीण आनंदा कांबळे (दोघे रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव, ता. करवीर) या दोघा भावांवर गुन्हा दाखल झाला. यातील प्रवीण कांबळे याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली आहे.
प्रियांश कन्सलटन्सी या कंपनीचे कार्यालय(ad fraud) शाहूपुरी पाच बंगला परिसरात आहे. कंपनीच्या प्रमुखांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर दरमहा ५ ते १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. स्टॅम्प पेपरवर करारपत्र करून परतावा देण्याची हमी दिली. संग्राम पाटील यांच्यासह शेकडो गुंतवणूकदारांनी डिसेंबर २०२० पासून कंपनीत पैसे भरले.
गुंतवणूकदारांना विश्वास बसावा म्हणून प्रारंभीचे काही महिने परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे थांबले. गुंतवणूकदारांनी वारंवार कंपनीच्या प्रमुखांकडे पाठपुरावा करूनही परतावे मिळाले नाहीत, तसेच मुद्दलही मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला.
अशा बोगस व फसव्या कंपनी्या विरोधात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेऊन कंपनीचा प्रमुख प्रवीण कांबळे याला अटक केली. त्याच्या भावाचा शोध सुरू आहे. अटकेतील संशयिताच्या चौकशीतून फसवणुकीची व्याप्ती समोर येईल, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिली. न्यायालयात हजर केले असता, अटकेतील कांबळे याची पोलीस कोठडीत रवानगी झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपयंर्त अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. २०२२ व २०२३ मध्ये पंधरा ते वीस बोगस कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले. २०२४ मध्ये प्रियांश कन्सलटन्सी या कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. गुंतवणूकदार कोणतीही खातरजमा न करता कसे फसतात असा प्रश्न पडतो.