वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीची खेळाडू एलिसा पेरीने सिक्स मारत गाडीची काच फोडली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.वुमन्स प्रीमिअर लीगमधील युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यामध्ये बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 198-3 धावा केल्या आहेत. सांगलीकर स्मृती मानधना आणि एलिस पेरी या दोघींच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबी संघाने धावांचा डोंगर उभा केला.
स्मृतीने 80 धावा तर पेरीने 58 धावा केल्या आहेत. या सामन्यात सिक्सर्स आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला, यामधील पेरीने मारलेला सिक्स सर्वात लक्षणीय ठरला. कारण पेरीने सिक्सर मारला त्याने थेट तिथे ठेवलेल्या गाडीचा काच फोडली.बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आज स्मृती मानधना आणि पेरीचं तुफान आलं होतं. यूपीच्या सगळ्या बॉलर्सला दोघींनी फोडून काढलं. स्मृतीने 50 चेंडूत 80 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकार मारले. स्मृती आज शतक करणार असं वाटत होतं मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात ती आऊट झाली.
स्मृती आऊट झाल्यावर पेरीने आपल्या हातात डावाची सूत्रे हातात घेतली. 19 व्या ओव्हरमध्ये एलिसा पेरीने दीप्ती शर्मा हिच्या दुसऱ्या बॉलवर गरगरीत षटकार ठोकला. चेंडू थेट तिथे ठेवण्यात आलेल्या कारच्या काचेवर बसला, जागेवरच काच फुटलेली पाहायला मिळाली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हनरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी