हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व असते. एकादशी ही तिथी भगवान विष्णूला समर्पित असल्याचे मानले जाते. यादिवशी श्रीहरी व माता लक्ष्मीचे पूजन करण्याची सुद्धा पद्धत आहे.
आज ६ मार्च २०२४ पासून माघ महिन्यातील एकादशी तिथीचा प्रारंभ होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आजची एकादशी ही विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. आजच्या दिवसाचे ग्रहमान पाहता चार राशींना विजया एकादशीचा पुरेपूर लाभ होणार असल्याची चिन्हे आहेत.
विजया एकादशीपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन होतील सुरु
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीचं मंडळींसाठी विजया एकादशीचा दिवस अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. या मंडळींना ताणतणावातून मुक्ती मिळाल्याने मन व तन दोन्ही शांत राहील. धनसंचय कामी येईल. आर्थिक बळ वाढण्याची चिन्हे आहेत. आरोग्याबाबत सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात. या कालावधीत तुमच्या हस्ते कुणाची तरी खूप मोठी मदत होऊ शकते.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीच्या मंडळींसाठी विजया एकादशी ही अनुकूल सिद्ध होऊ शकते. आपल्याला कामाच्या ठिकाणी थोडी मोकळीक मिळू शकेल. धनसंपत्तीची वाढ समजतील आपले स्थान आणखी मजबूत करू शकते. आयुष्यात सुख आणि सोयी वाढतील. भौतिक सुखाचा तुम्हाला लाभ घेता येईल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. वाद विकोपाला जाऊ देऊ नका. तुमच्या जोडीदाराची साथ लाभल्यास या कालावधीत लक्ष्मी व विष्णूची कृपा तुमच्यावर होऊ शकते.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीसाठी विजया एकादशी व बुधवारचा योगायोग खूपच फायद्याचा ठरू शकतो. तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारेल. मनसुबे पूर्ण होऊ शकतात. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचा योग आहे. भावंडांकडून एखादी अनपेक्षित व आनंदी माहिती मिळू शकते. माता व पित्याच्या रूपात विष्णू व लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. तुम्हाला वाणीच्या माध्यमातून धनलाभ संभवतो.कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
कन्या राशीच्या मंडळींना विजया एकादशीच्या मुहूर्तावर नोकरी संबंधित एखादी आनंदाची वार्ता मिळू शकते. आपल्याला या कालावधीत हितशत्रूंपासून अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला स्वतःचे मन उत्तम निर्णय घेण्यास मदत करेल. गुंतवणुकीवर भर द्या. शेअर बाजारातून लाभ होण्याची पुरेपूर शक्यता आहे. वैवाहिक सुखाने मन आनंदून जाईल. घराचे प्रश्न मार्गी लागतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)