एडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून एडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री स्वतःचं आयुष्य संपवत आहेत. जानेवारी महिन्यात अभिनेत्री थॅना फील्ड्स (Thaina Fields) तिच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळली. तिच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात काग्नी लिन कार्टर (Kagney Linn Karter) हिने वयाच्या 36 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता पुन्हा एका एडल्ट फिल्म अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
दोन अभिनेत्रींनंतर प्रसिद्ध एडल्ट फिल्म अभिनेत्री सोफिया लियोनी हिने देखील स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. सोफिया लियोनी हिने वयाच्या 26 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सोफिया लियोनी राहत्या घरात मृत अवस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
रिपोर्टनुसार, सोफिया लियोनी हिचे सावत्र वडील मायक रोमेरो यांनी एक स्टेटमेंट जारी करत सोफिया हिच्या निधानाची माहिती दिली आहे. सोफिया हिचे सावत्र वडील म्हणाले, ‘सोफियाच्या निधनानंतर तिची आई आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक तिच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबिय आणि तिच्या मित्रांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.’
सोफिया हिच्या सावत्र वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी सोफिया तिच्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली. सोफिया यांच्या निधनानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत. सोफिया हिला फिरायला प्रचंड आवडायचं… आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाला कसं आनंदी ठेवता येईल याकडे ती अधिक लक्ष द्यायची… असं देखील अभिनेत्रीचे वडील म्हणाले आहेत.
सोफिया लियोनी हिच्या निधनानंतर सोशल मीडियावर संतापाचं वातावरण तयार झालं आहे. कमी वयात अभिनेत्री स्वतःचं आयुष्य का संपवत आहेत… संशयास्पद मृत्यू का होत आहेत ? असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहेत… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोफिया लियोनी हिच्या निधनाची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या तिसऱ्या महिन्यातील हे तिसरं प्रकरण असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एडल्ट स्टार्स यांच्या निधनाची वाढती संख्या पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.