जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल नेहमी सज्ज असते. अशातच एअरटेलने पुन्हा एकदा नवीन रिचार्ज प्लान(recharge plan) ऑफर केला आहे. चांगली कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्कसाठी ही कंपनी देशातील दुसरी मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.
एअरटेलने(recharge plan) नुकतेच दोन नवीन प्लान आणले आहेत. ज्याविषयी खूप कमी युजर्सला माहित आहे. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अधिक डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल. जाणून घेऊया ऑफरबद्दल सविस्तर
एअरटेलचा ८३९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या लिस्टमध्ये ८३९ रुपयांचा (Price) प्लान आहे. या प्लानमध्ये कंपनी वापरकर्त्यांना ८४ दिवसांची वैधता ऑफर करते आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स करता येतील तसेच या प्लानमध्ये वापरकर्त्यांना एकूण 168GB इंटरनेट डेटा ऑफर करते आहे. दिवसाला तुम्हाला २ जीबी डेटा वापरता येईल. यासोबत १०० एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एअरटेल स्ट्रीम प्लेमध्ये १५ पेक्षा जास्त OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. यामुळे तुम्हाला ओटीटीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार नाही.एअरटेलचा ८६९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या लिस्टमध्ये ८६९ रुपयांचा प्लान देखील मिळत आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता देत आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमेटड कॉलिंगसह १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. 5G डेटासाठी तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. या प्लानमध्ये कंपनी युजर्सला दिवसाला १०० एसएमएसची ऑफर देत आहे. यावर तुम्हाला Disney Plus Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन मिळतेय.