एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 3 वर्षाच्या (sexually) चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या वयात मुलं खेळत बागडत असतात, त्याच वयात एका 14 वर्षाच्या मुलाने तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली.
ही घटना खूपच धक्कायक आहे. यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक (sexually) अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला अटक केली आहे. या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेबाबत, बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रजनीश सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी रविवारी सिरगीट्टी पोलिस स्टेशन परिसरात एका तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या आरोपाखाली एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.पोलिसांनी गुन्ह्याची माहिती लपवल्याबद्दल मुलाच्या काकाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, त्यांची तीन वर्षांची मुलगी काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली असून नंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता शेजारील मुलगाही गायब असल्याची माहिती मिळाली.
मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो मुलगा नंतर बाथरुममध्ये सापडला आणि मुलगीही जखमी अवस्थेत तेथे पडली होती. पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जेव्हा कुटुंबीय मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखमेच्या खुणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले, त्यानुसार मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी १४ वर्षीय मुलाला लैगिंक अत्याचार आणि हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या आरोपावरून त्याच्या काकाला अटक केली आहे. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.