Monday, October 7, 2024
Homenewsकंडोम ऐवजी वापरला ‘हा’ पदार्थ; सेक्स केल्यानंतर जीवाला मुकला

कंडोम ऐवजी वापरला ‘हा’ पदार्थ; सेक्स केल्यानंतर जीवाला मुकला


सेक्स करताना कंडोम नसल्याने नशेत असलेल्या तरुणाने चिकट पदार्थ लावला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने गुजरातमधील अहमदाबाद येथे खळबळ उडाली आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक तरुण आणि तरुणी एका हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी नशा केली. त्यानंतर दोघांनी सेक्स केला.
त्यावेळी त्याने कंडोमला पर्याय म्हणून गमसारखा चिकट पदार्थ आपल्या इंद्रियाला लावून तो भाग सील केला.
नशेत त्या दोघांनी सेक्स केला. २५ वर्षीय तरुणाने हा स्वत:सोबतच अघोरी प्रकार केला. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अहमदाबादच्या फतेहवाडी भागात राहणारा सलमान मिर्झा हा तरुण २२ जून रोजी आपल्या मैत्रिणीसोबत जुहापुरा भागातील एका हॉटेलमध्ये गेला होता.
तेथे गेल्यावर दोघांनी ड्रग्जचे सेवन केले. त्यानंतर सेक्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे कंडोम नव्हता.
त्यामुळे नशेत असलेल्या सलमानने आपल्या इंद्रियाला गमसारखा चिकट पदार्थ लावून तो भाग सील केला. त्यानंतर सेक्स केला.
या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सलमान हा बेशुद्धावस्थेत एका टॉवरजवळ आढळला. तो झुडपात पडला होता.
त्याला ओळखीच्या लोकांनी घरी नेले. मात्र, तो खूपच अशक्त आणि बेशुद्ध असल्याने त्याला तातडीने सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
उपचारादरम्यान मृत्यू
दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणानंतर कुटुबीयांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला.
२५ जून रोजी मृत तरुणाचे नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, संबधित तरुणाने आपल्या इंद्रियाला चिकट पदार्थ लावला.
त्यामुळे तरुणाचे आरोग्य बिघडले असावे असा संशय आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे. यासाठी व्हिसेरा अहवालाची वाट पाहत आहोत.
पोलिस अधीक्षक प्रेमसुख डेलू म्हणाले, संबधित तरुणाच्या व्हिसेरा चाचणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
फॉरेन्सिक तपासणी अवहालाचीही प्रतीक्षा आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -