इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला हळूहळू रंगत चढू लागली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरु आहे. जयपरायजामुळे गुणतालिकेत उलटफेर दिसून येत आहे. त्यामुळे पुढील प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यातील महत्त्वाच्या खेळाडूंबाबत
आयपीएल 2024 स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. दोन्ही संघांचा या पर्वातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे कोणतातरी एक संघ विजयाचं खातं खोलेल, तर एका संघांची स्पर्धेतील धडपड आणखी तीव्र होणार आहे. आयपीएल इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण 21 सामने झाले आहेत. त्यापैकी 9 सामन्यात हैदराबादने, तर 12 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. मागच्या पर्वात दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते आणि दोन्ही वेळेस मुंबईने बाजी मारली आहे. मुंबई इंडियन्सचा हैदराबाद विरुद्ध सर्वोत्तम स्कोअर हा 235 इतका आहे. तर हैदराबादचा मुंबई विरुद्ध सर्वोत्तम स्कोअर हा 200 इतका आहे. त्यामुळे मागची आकडेवारी आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ सर्वस्वी पणाला लावतील. कर्णधार हार्दिक पांड्या आणि पॅट कमिन्स यांची कसोटी लागणार आहे.
मुंबई इंडियन्सला संघाला रोहित शर्मा आणि इशान किशनकडून अपेक्षा असतील. पहिल्या सामन्यात या दोघांनी हवी तशी कामगिरी केली नाही. इशानला तर खातंही खोलता आलं नाही. तर मधल्या फळीत हार्दिक पांड्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. मुंबई इंडियन्सकडून विजयाची चावी रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांच्या हाती असेल. तर हैदराबादच्या हेन्रिक क्लासेन, मयंक अग्रवाल, एडेन मार्करम, मार्को जानसेन, पॅट कमिन्स, टी नटराजन आणि मयंक मार्केंडय यांच्यावर विजयाची धुरा असेल. तसं पाहिलं तर मुंबईच्या तुलनेत हैदराबादच्या संघात चांगले आणि तगडे खेळाडू आहेत.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेविड, शम्स मुलानी, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वूड.
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11: मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसन, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे आणि टी नटराजन.
विजयश्री खेचून आणू शकणारे खेळाडू – हेन्रिक क्लासेन (कर्णधार/विकेटकीपर), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, एडेन मार्करम, हार्दिक पांड्या, मार्को जानसन, पॅट कमिंस, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), टी नजराजन, गेराल्ड कोएत्जी आणि मयंक मारकंडे