Thursday, April 25, 2024
Homeतंत्रज्ञानOnePlus चा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात घालतोय धुमाकूळ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus चा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात घालतोय धुमाकूळ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नुकताच स्मार्टफोनच्या बाजारामध्ये OnePlus चा OnePlus Ace 3V लाँच झाला आहे. हा फोन

Ace 3V मध्ये अपग्रेड म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये यूजर्सला अनेक विविध फीचर्स अनुभवायला मिळतील. कंपनीकडून या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 प्राइमरी कॅमेराही देण्यात आला आहे. त्यामुळेच हा फोन सर्वाधिक आकर्षित ठरत आहे. सध्या तुम्ही देखील सणासुदीच्या मुहूर्तावर एखादा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर या फोनची किंमत आणि फीचर नक्की जाणून घ्या.

Ace 3V फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 2,150 nits पीक ब्राइटनेस लेव्हल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,772 x 1,240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर असून 16GB LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज फोनमध्ये उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर, या स्मार्टफोनसह तीन वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी पॅच देणार येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

 

खास म्हणजे या फोनमध्ये मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा उपलब्ध आहे. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात OnePlus Ace 3V ची बॅटरी 5,500mAh आहे. तसेच, 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये मिळत आहे.

Ace 3V किंमत

OnePlus Ace 3V ची किंमत 12GB + 256GB च्या बेस व्हेरिएंटसाठी 23,321 रुपये रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 12GB + 512GB व्हेरियंटची किंमत 26,846 तर 16GB + 512GB व्हेरियंटची किंमत 30,350 इतकी आहे. हा स्मार्टफोन पर्पल सिल्व्हर आणि टायटॅनियम ग्रे कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या फोनचे मॉडेल सर्वात आकर्षित आणि युनिक दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -