राजस्थान रॉयल्सने आयपीएल्या 17 व्या मोसमातील नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 12 धावांनी मात केली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 173 धावाच करता आल्या.
दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि अखेरीस ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी 40 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. मात्र या दोघांव्यतिरिक्त इतरांना काही विशेष करता आलं नाही. राजस्थानने अशाप्रकारे या हंगामातील आपला सलग दुसरा सामना जिंकला. तर दिल्लीचा हा दुसरा पराभव ठरला.शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरला
दिल्लीला विजयसाठी 20 व्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती. तर मैदानात ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल ही सेट जोडी खेळत होती. दिल्लीकडून आवेश खान याने हुशारीने 20 ओव्हर टाकली. आवेशने आपल्या या ओव्हरमध्ये एकही बॉल मारायला दिला नाही. आवेशची हीच अखेरची ओव्हर निर्णायक ठरली. दिल्लीला विजयाची संधी होती.
मात्र आवेशने मॅच फिरवली. आवेशने फक्त 4 धावाच दिल्या आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर 49, मिचेल मार्श 23, रिकी भुई 0, कॅप्टन ऋषभ पंत 28, ट्रिस्टन स्टब्स 44*, अभिषेक पोरेल 9, अक्षर पटेल 15 धावा केल्या. तर राजस्थानकडून नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर आवेश खान याने 1 विकेट घेतली.
राजस्थानची बॅटिंग
त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानने या संधीचा फायदा घेत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. रियान पराग याने राजस्थानसाठी सर्वाधिक नाबाद 84 धावांची खेळी केली.
रियानच्या या खेळीत 7 चौकार आणि 6 सिक्सचा समावेश होता. तसेच यशस्वी जयस्वाल 5, जॉस बटलर 11, कॅप्टन संजू सॅमसन 15, आर अश्विन 29, ध्रुव जुरेल 20 आणि शिमरॉन हेटमायर 14* धावा केल्या. तर दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नॉर्तजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या पाच जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
राजस्थानचा सलग दुसरा विजय
दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर ), डेव्हीड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन : संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आवेश खान.