निकोलस पूरन याच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील विजयाचं खातं उघडलं. तर पंजाबला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या लखनऊकडून क्विंटन डी कॉक 54, कृणाल पंड्या 43* आणि निकोलस पूरन याने 42 धावा केल्या. लखनऊने या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर पंजाबला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं.
लखनऊच्या या आव्हानाला पंजाबकडून प्रत्युत्तर देताना कॅप्टन शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टो या दोघांनी 70 आणि 42 धावा केल्या. मात्र त्यानंतर पंजाबच्या एकालाही विजयी खेळी करता आली नाही. पंजाबला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 178 पर्यंतच मजल मारता आली. लखनऊ अशाप्रकारे 21 धावांनी जिंकली. पंजाबला विजय मिळवता आला नाही. मात्र शिखर धवन आणि निकोलस पूरन या दोघांना फलंदाज म्हणून फायदा झाला.
विराट कोहली याच्याकडेच ऑरेंज कॅप
बंगळुरुच्या विराट कोहली याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. विराट कोहली याने पहिलं आणि हैदराबादच्या हेन्रिच क्लाने याने दुसरं स्थान कायम राखलंय. तर शिखर धवनने 70 धावांसह थेट टॉप 5 मध्ये एन्ट्री घेतलीय. शिखर तिसऱ्या क्रमांकावर पोहचल्याने राजस्थान रॉयल्सच्या रियान पराग याला नुकसान झालंय. रियान पराग तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी गेला आहे. तर पाचव्या क्रमांकावर असलेला अभिषेक पूरन याला फटका बसलाय. अभिषेकची सातव्या क्रमांकावर घसरण झालीय. तर पाचव्या स्थानी निकोलस पूरन याने झेप घेतलीय.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग इलेव्हन : निकोलस पूरन (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव आणि मणिमरन सिद्धार्थ.
पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.