शेअर बाजारात अनेक बदल होत आहे. आताच T+0 Settlement नियम लागू झाला. बाजारात चढउताराचे सत्र दिसून येत आहेत. या हिंदोळ्यातही या 21 स्टॉकनी जोरदार कामगिरी बजावली. या शेअर्सला गुंतवणूकदारांनी 21 तोफांची सलामी दिली. कोणते आहेत हे स्टॉक्स?
चालू आर्थिक वर्षाचा (2023-24) आज शेवटचा दिवस आहे, या आर्थिक वर्षांत काही शेअर्सने गुंतवणूकदारांनी जोरदार कमाई करुन दिली. या कालावधीत स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक्समुळे ग्राहकांची चांदी झाली. त्यांना ताबडतोब कमाई करता आली. सेन्सेन्सक आणि निफ्टी 50 या कालावधीत 30 टक्क्यांनी वधारला. Small And Midcap Index 65 टक्क्यांनी उसळला. शेअर बाजारात इंडेक्समध्ये मोठी वाढ झाल्याने अनेक स्टॉक्सने मल्टिबॅगर रिटर्न दिला. Ace Equity Index च्या डाटानुसार, बीएसई 500 निर्देशांकातील 113 शेअर्सनी गुंतवणूकदारांना दुप्पट, तर 330 शेअर्संनी जोरदार कामगिरी बजावली. BSE500 Index मधील 20 स्टॉकनी तिप्पट कमाई करुन दिली.
या दोघांची दमदार कामगिरी- आर्थिक वर्षात सर्वाधिक कमाईदार स्टॉकमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) सर्वात पुढे आहे. एकाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 441 टक्के रिटर्न दिला आहे. 26.34 रुपयांहून हा स्टॉक 142.4 रुपयांवर पोहचला आहे. दुसरा खेळाडू सुजलॉन एनर्जी ठरला. चालू आर्थिक वर्षांत हा स्टॉक 7.95 रुपयांहून थेट 40.47 रुपयांवर पोहचला. या कालावधीत शेअरने 400 टक्क्यांचा परतावा दिला.
हे शेअर ठरले मल्टिबॅगर –आर्थिक वर्ष 2024 मध्ये Hudco, मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स, ज्युपिटर वॅगन्स, इरकॉन इंटरनॅशनल, REC हे मल्टिबॅगर स्टॉक ठरले. एका वर्षात या स्टॉकनी ग्राहकांन 310-330 टक्क्यांचा परतावा दिला. अनेक ब्रोकरेज हाऊस अजून या शेअरमध्ये तुफान येण्याचा अंदाज वर्तवित आहेत.
या खेळाडूंचा तिप्पट परतावा – कल्याण ज्वेलर्स इंडियाने 290 टक्के, कोचिन शिपयार्डने 280 टक्के, रेल्वे विकास निगमने 280 टक्के, SJVN स्टॉक्सने 270 टक्के, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने 255 टक्के, झोमॅटोने 255 टक्के, भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने 250 टक्के रिटर्न दिला आहे. याशिवाल सोभा, NBCC, स्वान एनर्जी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, अपार इंडस्ट्रीज आणि एनएलसी इंडियाचे शेअर 200-240 टक्के चढले.