Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराम मंदिर ट्रस्टचा महत्वाचा निर्णय, रामलल्लाचे कपडे बदलले, कारण…

राम मंदिर ट्रस्टचा महत्वाचा निर्णय, रामलल्लाचे कपडे बदलले, कारण…

 

अयोध्यात राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यानंतर देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक येत आहेत. राम मंदिर ट्रस्टकडून भाविकांसाठी अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आता राम मंदिरात रामलल्लाचे कपडे बदलण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती ट्रस्टकडून सोशल मीडियावर देण्यात आली आहे. तापमान वाढत असल्यामुळे रामलल्लाच्या पोशाखात बदल करण्यात आला आहे. भगवान रामलल्ला यांना आता सुती कपडे परिधान केले जात आहे. शनिवारपासून हा बदल करण्यात आला आहे.काय म्हटले पोस्टमध्ये

राम मंदिर ट्रस्टकडून एक पोस्ट X वर लिहिली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, “उन्हाळ्याचे आगमन झाले आहे. यामुळे तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे भगवान रामलल्ला यांना आजपासून सुती कपडे परिधान केले जात आहेत.” आज भगवान राम यांनी परिधान केलेले कपडे हस्तनिर्मित सुती मलमलपासून बनलेले आहेत. जे नैसर्गिक निळ्या रंगाने बनले आहेत. तसेच गोटाच्या फुलांनी सजवण्यात आले आहेत. या पोस्टसोबत रामलल्लाचा एक सुंदर फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टबरोबर ट्रस्टने नवीन कपडे असलेल्या सुंदर मूर्तीचा फोटोही शेअर केला आहे.

 

पूर्वी सिल्कचे कपडे होते

श्रीराम जन्मभूमीचे मुख्य अर्चक आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, पूर्वी रामलल्ला यांना सिल्कचे कपड्यांचा पोशाख परिधान केला जात होता. परंतु वाढत्या तापमानामुळे त्यात बदल करुन आता उन्हाळ्यासाठी अनुकूल असणारे सूती वस्त्र परिधान केले जात आहेत. भोगमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही.राम नववीची जोरदार तयारी

अयोध्यात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर प्रथमच राम नवमी येत आहे. यामुळे 15 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान 24 तास राम मंदिर खुले राहणार आहे. दिवस असो की रात्री केव्हाही रामभक्त रामलल्लाचे दर्शन करु शकणार आहे. राम नवमीनिमित्त राम मंदिर दर्शनासाठी 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त राम मंदिरच 24 तास सुरु राहणार नाही तर अन्य व्यवस्था विस्तृत करण्यात येणार आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -