Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडाMI vs RR : हार्दिकची वानखेडेत अग्नीपरीक्षा, पहिला विजय मिळवून देण्याचं आव्हान

MI vs RR : हार्दिकची वानखेडेत अग्नीपरीक्षा, पहिला विजय मिळवून देण्याचं आव्हान

 

हार्दिक पंड्या याच्यासाठी आयपीएलचा 17 वा हंगाम आतापर्यंत फार वाईट राहिला आहे. हार्दिकला कॅप्टन म्हणून मुंबईला दोन्ही सामन्यात विजय मिळवून देण्यात अपयश आलं. त्यात क्रिकेट चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागला. अशात आता वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात हार्दिकची अग्नीपरीक्षा असणार आहे.

 

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपल्या होम ग्राउंडमधील पहिला आणि एकूण तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स विरुद्ध घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये भिडणार आहे. मुंबई-राजस्थान यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. राजस्थानला या हंगामात विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याच्यासमोर मुंबईला पराभवाच्या हॅटट्रिकमधून तारण्याचं आव्हान असणार आहे. इतकंच नाही, तर पंड्याची वानखेडे स्टेडियममध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या चाहत्यांसमोर चांगलीच कसोटी लागणार आहे.

 

हार्दिकला मुंबईचा कॅप्टन झाल्याच्या दुसऱ्या क्षणापासून विरोधाचा सामना करावा लागतोय. रोहितला हटवून हार्दिकला मुंबईचा कॅप्टन केल्याचा राग चाहत्यांना आहे. त्यात हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईचा सलग 2 सामन्यात पराभव झाला आहे. त्यात रोहित आणि लसिथ मलिंगा यांच्यासोबतच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओमुळे हार्दिकला मुंबईच्या चाहत्यांचा अधिक रोषाचा सामना करावा लागला. हार्दिकच्या विरोधाच्या लाटेने आता रौद्र रुप घेतलंय, कारण रोहितच्या घरच्या मैदानात असलेला सामना.

 

क्रिकेट चाहत्यांनी हार्दिकवर त्याच्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच जोरदार टीका केली होती. काहींनी तर खालची पातली गाठून शिवीगाळही केली होती. त्यामुळे आता वानखेडे स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन म्हणून हार्दिकसमोर मुंबईला विजय मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे. तर मुंबई आणि रोहितच्या चाहत्यांच्या टीकेचा सामनाही हार्दिकला करावा लागणार आहे. त्यामुळे हार्दिकची अग्नीपरीक्षा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

हार्दिक पंड्याचं वानखेडेत स्वागत

 

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोवमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

 

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -