लोकसभा निवडणुकीसंदर्भातील ४८ जागांबाबत येत्या २ दिवसात जागावाटपाचं सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचं शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा असल्याची माहिती देत यवतमाळ आणि वाशिमच्या जागेवर तिढा कायम असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली. राज्यात ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत ते देखील दोन दिवसात होतील.
आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जो राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला त्या आम्ही जिंकणार , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहे. त्यामुळे त्यांच्याशी भेटीगाठी देखील घेतल्या जात आहेत. अशातच ४८ जागांबाबत येत्या २ दिवसात सगळं चित्र स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.