आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघ सलग सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले आहेत. असं असताना मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन एका भलत्याच अवतारात समोर आला.
सुपरमॅनचा ड्रेस घालून इशान किशन का फिरत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इशान किशन हाच ड्रेस कोड घालून एअरपोर्टवर गेला आणि त्याचा ड्रेसकोड पाहून फॅन्सही चक्रावून गेले. पण यामागचं कारण ऐकून तु्म्हालाही हसू आवरणार नाही. इशान किशनला असा ड्रेस कोड देण्यामागचं कारण मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून दिलं आहे. फ्रेंचायसीच्या मते हा ड्रेस असा तसा नसून एक शिक्षा आहे. मुंबई इंडियन्सने टीम मीटिंगमध्ये उशिराने येणाऱ्यांसाठी ही आयडीया शोधून काढली आहे. याबाबतची माहिती फ्रेंचायसीने ट्विटरवर दिली आहे.
इशान किशनच नाही तर संघातील इतर तीन खेळाडूंनाही शिक्षा मिळाली आहे. फिरकीपटू कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा यांनाही फ्रेंचायसीने वठणीवर आणलं आहे. चारही जणं हॉटेलच्या रुममधून सुपरमॅनचा ड्रेस घालून बाहेर पडले. दरम्यान, इशान किशनला मागच्या तीन सामन्यात सूर काही गवसलेला नाही. तीन सामन्यात त्याने फक्त 50 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तर खातंही खोललं नाही.दुसरीकडे, नेहल वढेराही फलंदाजी मीटिंगमध्ये उशिराने पोहोचलाा. त्यामुळे त्याला एअरपोर्टवर पॅड बांधून चालण्याची शिक्षा मिळाली होती. यावेळी सर्वजण नेहल वढेराकडे टक लावून पाहात होते. “मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू नेहल वढेराने मुंबई विमानतळावर त्याच्या ओओटीडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक जंपसूट ऐवजी पॅडसह दिसला.
आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहलला फलंदाजांच्या बैठकीला उशीर झाल्याबद्दल खेद वाटतो.”, अशी कॅप्शन लिहिली आहे.मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस.