Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रमुलीला व्हायचं होतं डॉक्टर, वडिलांनी कर्ज काढून दिले 19 लाख; पण....

मुलीला व्हायचं होतं डॉक्टर, वडिलांनी कर्ज काढून दिले 19 लाख; पण….

बीएएमएस झालेल्या मुलीला एमडी व्हायचं होतं. त्यासाठी वडिलांनी कर्ज काढून पैसे दिले होते. मात्र एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असं सांगून तिघांनी १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवडे आणि पिंपरी इथं जानेवारी २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. तरुणीला पिंपरीतील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देता असं सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुणीचं बीएएमएस पूर्ण झालं आहे. डॉक्टर असणाऱ्या तरुणीला एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा तिला संशयित भास्कर राव याने आपण महाविद्यालयात व्यवस्थापनात काम करत असल्याचं सांगितलं. व्यवस्थापन कोट्यातून पिंपरी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असं तिला सांगितलं विश्वास संपादन केला. त्यानंतर तरुणीकडे पैशांचीही मागणी केली. वडिलांनी कर्ज काढून संशयित विशाल पवार, भास्कर राव आणि कूलभूषण कांबळे या तरुणांना १९ लाख ७५ हजार रुपये दिले. पैसे दिले तरी प्रवेशाचे काम होत नसल्याने तरुणीने त्यांच्या मागे तगादा लावला.

 

धनादेश दिले पण वटले नाही

संशयितांकडून होत असणारी टाळाटाळ वाढल्याने शेवटी फिर्यादी तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. तिथेही संशयितांनी पैसे देऊ असं लेखी स्वरुपात मान्य केलं. त्यानंतर तिला धनादेशही दिले. पण ते धनादेश वटले नाहीत. पुन्हा तरुणीने पोलिसात तक्रार केल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शैक्षणिक वर्ष गेले वाया

दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणीचे वर्ष वाया गेले. तिने गेल्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. तरुणीकडून संशयितांनी पैसे घेतले पण प्रवेश मिळवून न देता फसवणूक केल्याने तिच्यासह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -