Monday, December 23, 2024
Homeक्रीडामुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यात या खेळाडूंकडे असेल विजयाची चावी, जाणून घ्या

मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यात या खेळाडूंकडे असेल विजयाची चावी, जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेतील 20व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची स्थिती काही वेगळी नाही. दिल्ली कॅपिटल्सने चार पैकी तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स नवव्या, तर मुंबई इंडियन्स दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून विजयी ट्रॅकवर येण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स 33 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 18 सामन्यात मुंबईने, तर 15 सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. मागच्या पाच सामन्यांचा विचार करता दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे.वानखेडेवर दोन्ही संघ आठवेळा भिडले आहेत. त्यात पाचवेळा मुंबईने, तर तीनवेळा दिल्लीने विजय मिळवला आहे.

आतापर्यंत स्पर्धेतील कामगिरी पाहता दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू उजवे आहेत. त्यामुळे सामना फिरवण्यात दिल्लीचे 7 आणि मुंबईचे 5 खेळाडू महत्त्वाचे ठरतील. दिल्लीकडून ऋषभ पंत, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्त्जे, इशांत किशन आणि मिचेल मार्श असेल. तर मुंबईकडून हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्या खांद्यावर धुरा असणार आहे. जसप्रीत बुमराहही यात महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीवर क्रीडाप्रेमींची नजर असणार आहे.

 

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, क्वेना मफाका, पियुष चावला, आकाश मढवाल.दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -