Thursday, May 16, 2024
Homeमहाराष्ट्रआता एक नव्हे तीन प्रकारच्या वंदे भारत धावणार, आणखी तीन बुलेट ट्रेन...

आता एक नव्हे तीन प्रकारच्या वंदे भारत धावणार, आणखी तीन बुलेट ट्रेन सुरु करणार

 

अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. लवकरच ही ट्रेन सुरु आहे. ही ट्रेन पश्चिम भागात सुरु करण्यात आली आहे. परंतु आता आणखी तीन बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. त्यातील एक बुलेट ट्रेन उत्तर भारतात सुरु होणार आहे.

 

रेल्वे प्रवाशांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरणाऱ्या वंदे भारत ट्रेनसंदर्भात महत्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध करताना रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वंदे भारत ट्रेनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. परंतु त्यापुढे जाऊन तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन भारतात धावणार आहेत. त्यात स्लीपर, चेअरकार आणि मेट्रो वंदे भारत असणार आहे. लांब पल्यांसाठी स्लीपर वंदे भारत असणार आहे. मेट्रो वंदे भारत ट्रेनने कमी अंतरावरील दोन शहरे जोडली जाणार आहेत. चेअरकार वंदे भारत आता सुरुच आहेत. यामुळे सर्वच रेल्वे प्रवाशांना वंदे भारत ट्रेनचा आनंद घेत येणार आहे. त्याचवेळी बुलेट ट्रेनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. त्यानुसार देशातील प्रत्येक भागात एक अशा चार बुलेट ट्रेन सुरु होणार आहे.

 

मुंबई-अहमदाबादनंतर या बुलेट ट्रेन

अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. लवकरच ही ट्रेन सुरु आहे. ही ट्रेन पश्चिम भागात सुरु करण्यात आली आहे. परंतु आता आणखी तीन बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. त्यातील एक बुलेट ट्रेन उत्तर भारतात सुरु होणार आहे. दुसरी बुलेट ट्रेन दक्षिण भारतात सुरु होईल. तसेच पूर्व भारतमध्ये एक बुलेट ट्रेन सुरु करणार आहे. त्यासाठी लवकर सर्व्हेचे काम सुरु होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना दिली.

 

तीन प्रकारच्या सुविधा देणार

सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर या तीन प्रकारच्या पायाभूत सुविधांसह भाजप २१व्या शतकातील भारताचा पाया मजबूत करणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सामाजिक पायाभूत सुविधांसाठी आम्ही नवीन शिक्षण संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये उघडत आहोत. भौतिक पायाभूत सुविधांसाठी आम्ही देशभरात महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांचे आधुनिकीकरण करत आहोत. डिजिटल पायाभूत सुविधांसाठी, आम्ही 5G चा विस्तार करत आहोत आणि 6G वर काम करत आहोत, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -