भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा नवीन भूमिकेत दिसला आहे. हिटमॅन असलेल्या रोहित शर्माने बसचे स्टेअरिंग हातात घेतले आहे. रोहित शर्मा याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित शर्माचे फॅन्स हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. त्याच्यावर अनेक कॉमेंट पडल्या आहेत. त्याची चांगलीच चर्चा होत आहे.आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पांड्याकडे सूत्र दिली. त्यानंतर रोहित शर्माचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या तीन सामन्यांत पराभूत झाला. आता रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 33 सेंकदाच्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बस चालकाच्या भूमिकेत आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बसच्या स्टेअरिंगवर बसला असून मुंबई इंडियन्सचे खेळाडू बसमध्ये चढताना दिसत आहेत. रोहित शर्मा समर्थकांना रस्ता मोकळा करण्याचे सांगत आहेत. त्याचवेळी इतर खेळाडू बस चालकाच्या कॅबिनमध्ये येतात आणि फोटो काढतात. रोहित शर्माही चालकाच्या जागेवर बसून समर्थकांचा फोटो काढताना दिसत आहे. दुसरीकडे रोहितचे समर्थकही व्हिडिओ करताना दिसत आहेत.व्हिडिओवर अनेक कॉमेंट
रोहित शर्मा याचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल केला जात आहे. एक फॅनने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘रोहित भाई बस चला रहे हैं. आज स्पीड 200 के पार.’ दुसरा युजर म्हणतो, रोहित शर्मा बस चलवतानाचा व्हिडिओ किती सुंदर आहे.मुंबई इंडियन्सच्या संघाने रॅयल चॅलेंजर बंगळूरला पराभूत करत दुसरा विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ पाच सामन्यात दोन विजयसह प्वॉइंट्स टेबलवर सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सात गडी राखून पराभव केला होता. आता आज चेन्नई सुपर किंग्स विरोधात मुंबईचा सामना होणार आहे