Sunday, May 19, 2024
Homeब्रेकिंगमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली डेडलाईन, अन्यथा पुन्हा….

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली डेडलाईन, अन्यथा पुन्हा….

 

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, भावनेच्या जीवावर राजकारणात मत घेता येत नाही. मी निवडणूक लढणार नाही. मला माझा मराठा बांधव महत्त्वाचा आहे. मला सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी मला पाठिंबा दिला होता. यामुळे मी खासदार झाला असतो. पण…

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मराठा आरक्षणाचा विषय मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मांडला. तसेच त्यांनी एका नव्या आंदोलनाची घोषणा केली. लोकसभेत नाही परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही जोरात करणार आहोत. तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला नाही तर 4 जूनलाच मी आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही आहे लोकचळवळीचा मार्ग मला माहीत आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. लोकसभेत आम्ही उतरलो नाही, परंतु विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत. मराठा कोणाच्या सभांना देखील जात नाही. ते फक्त मजा बघत आहेत. ते उमेदवारांना पाडणार आहेत. तो देखील आमचा मोठा विजय होणार आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांना 6 जाती धर्माची लोकं एकत्र आणता आली असती. पण आम्हाला वेळ कमी होता. लोकसभा निवडणूक खूप मोठी असते. त्याचे कार्यक्षेत्र मोठे असते.

 

6 जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा…

मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने मी आहे. आता 6 जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन सुरु आहे. आपण 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला महायुतीने काय दिले नाही, पण महाविकास आघाडीवाले तरी कुठे शहाणे आहेत. त्यांनी तर होते ते आरक्षण घालवले. मराठा आरक्षण गोरगरीबांचा लढा आहे. तो आता यशस्वी होणार आहे.

 

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, भावनेच्या जीवावर राजकारणात मत घेता येत नाही. मी निवडणूक लढणार नाही. मला माझा मराठा बांधव महत्त्वाचा आहे. मला सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी मला पाठिंबा दिला होता. यामुळे मी खासदार झाला असतो. परंतु राजकारण हे आपले क्षेत्र नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -