Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंगतुझ्याशिवाय आयुष्य..; ‘तारक मेहता..’ फेम जेनिफर मिस्त्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

तुझ्याशिवाय आयुष्य..; ‘तारक मेहता..’ फेम जेनिफर मिस्त्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

 

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफरची छोटी बहीण डिंपलचं निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून ती आरोग्याच्या समस्यांचा सामना करत होती. अखेर 13 एप्रिल रोजी तिची प्राणज्योत मालवली. बहिणीच्या निधनानंतर जेनिफरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. प्रकृती खालावल्याने डिंपलला दहा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती व्हेंटिलेटरवर होती. खाजगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडत नसल्याने डिंपलच्या कुटुंबीयांनी तिला सरकारी रुग्णालयात हलवलं होतं. वयाच्या 45 व्या वर्षी डिंपलने अखेरचा श्वास घेतला.

बहिणीच्या आठवणीत जेनिफरने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘माझी प्रेमळ बहीण डिंपल, तुझ्याविना आयुष्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. लव्ह यू, मिस यू. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद कसा लुटला पाहिजे, हे तू आम्हाला शिकवलंस. परिस्थिती कशीही असो, तू नेहमीच हसत राहिलीस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेनिफर तिच्या खासगी आयुष्यात सतत विविध समस्यांचा सामना करत असल्याचं म्हटलंय. 2022 मध्ये भावाच्या निधनानंतर ती माहेरच्या सात मुलींची जबाबदारी उचलत असल्याचं तिने सांगितलं. या समस्यांदरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू आहे.

तारक मेहता..’ ही मालिका सोडल्यानंतर जेनिफरला अद्याप कोणती चांगली ऑफर मिळाली नाही. तिने मालिकेच्या निर्मात्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयाने जेनिफरच्या बाजूने निर्णय दिला असून असितकुमार मोदी यांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जेनिफरने 15 वर्षांपासून ‘तारक मेहता..’ या मालिकेत काम केलं. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने ही मालिका सोडली. निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली होती, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -