Monday, July 7, 2025
Homeक्रीडारोहित शर्मा रचणार असा विक्रम, धोनीच्या रेकॉर्डशी करणार बरोबरी

रोहित शर्मा रचणार असा विक्रम, धोनीच्या रेकॉर्डशी करणार बरोबरी

 

आयपीएल 2023 स्पर्धेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना खूपच खास असणार आहे. कारण या सामन्यानंतर दोन्ही संघांची प्लेऑफची दिशा कळणार आहे. हा सामना रोहित शर्मासाठीही खास असून आणखी एक मैलाचा दगड गाठणार आहे.

पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील नाणेफेकीचा कौल होताच रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम रचला जाणार आहे. कारण आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

महेंद्रसिंह धोनी या यादीत अव्वल स्थानी असून चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे जायंट्ससाठी एकूण 256 सामने खेळला आहे. यासह महेंद्रसिंह धोनीने एक खास विक्रम नोंदवला आहे.

रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी एकूण 249 सामने खेळला आहे.पंजाब किंग्सविरुद्ध मैदानात उतरताच 250 सामन्यांचा पल्ला गाठणार आहे. महेंद्रसिंह धोनीनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू ठरेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा दिनेश कार्तिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी 249 सामने खेळला आहे

रनमशिन्स विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून विराट कोहली आरसीबीसाठी खेळत आहे. विराट कोहली आतापर्यंत 244 सामने खेळला आहे आणि अजून 6 सामने खेळताच 250 सामन्यांचा पल्ला गाठेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -