लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सवर 8 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनऊने हे आव्हान 1 ओव्हर राखून आणि 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लखनऊने 2 विकेट्स गमावून 19 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या. लखनऊचा हा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील चौथा विजय ठरला. लखनऊने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. लखनऊसाठी कॅप्टन केएल राहुल याने कॅप्टन्सी इनिंग खेळली.
लखनऊकडून कॅप्टन केएल राहुल याने 3 सिक्स आणि 9 चौकारांच्या मदतीने 53 बॉलमध्ये 154.72 च्या स्ट्राईक रेटने 82 धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉक याने 5 चौकार आणि 1 सिक्ससह 125.58 च्या स्ट्राईक रेटने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर त्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टोयनिस या दोघांनी लखनऊला विजयापर्यंत पोहचवलं. निकोलसने 12 बॉलमध्ये नॉट आऊट 23 धावा केल्या. तर मार्क्स स्टोयनिस 7 बॉलमध्ये 8 धावा करुन नाबाद परतला. तर चेन्नईकडून मुस्तफिजूर रहमान आणि मथीशा पथीराणा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी लखनऊने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक धावा केल्या. जडेजाने सर्वाधिक नाबाद 57 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी आणि मोईन अली या तिघांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे चेन्नईला 150 पार मजल मारता आली. रहाणेने 36 आणि मोईनने 30 धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनीने 9 बॉलमध्ये 28 धावांनी फिनिशिंग खेळी केली. तर लखनऊकडून कृणाल पंड्याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहसिन खान, यश ठाकुर, रवी बिश्नोई आणि मार्क्स स्टोयनिस या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
लखनऊचा विजयी क्षण
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पाथीराना.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकुर.