आयपीएल 2024 स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात महत्त्वाचा सामना पार पडला. कारण टॉप 4 खाली असलेल्या संघांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रत्येक सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे विजयासाठी पाचव्या क्रमांकापासून पुढे असलेल्या प्रत्येक संघांचा खटाटोप आहे. असं असताना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या तळाच्या संघांची लढत पार पडली. गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सला अवघ्या 142 धावांवर रोखलं आणि 143 धावांचं सोपं आव्हान मिळवलं. हे आव्हान गाठताना गुजरात टायटन्सची काही अंशी दमछाक झाली.
मधल्या फळीत राहुल तेवतियाने चांगली फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. 19.1 षटकात 7 गडी गमवून गुजरातने पंजाब किंग्सने दिलेलं आव्हान गाठलं. या विजयामुळे गुजरात टायटन्सला जबर फायदा झाला आणि आठव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र असं असूनही गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल नाराज आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “हा सामना लवकर संपवायला आवडले असते, पण ते दोन गुण मिळवणे कधीही चांगले. कर्णधाराची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप रोमांचक आहे. ओव्हर रेट वगळता सर्व काही चांगले झाले आहे. मी जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा मला फक्त फलंदाज म्हणून खेळायचे असते, जो चेंडू मी आऊट झालो, मी तो निर्णय मी फलंदाज म्हणून फलंदाजी करत असतो तरी घेतला असता.” गुजरात टायटन्सने हा सामना लवकर संपवला असता तर नेट रनरेटवर फरक पडला असता. त्यामुळे पाचव्या स्थानी झेप घेता आली असती. तसेच पुढे जाऊन प्लेऑफची शर्यत चुरशीची होणार आहे. त्यात नेट रनरेट खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.