इचलकरंजी/प्रतिनिधी –
जायंटस् ग्रुप ऑफ उत्कर्षा सहेली शहापूरची नुतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सौ. राजश्री सुधीर माने यांची निवड करण्यात आली आहे. येथील कामगार कल्याण भवन येथे संपन्न कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. राजश्री माने यांनी पदग्रहण करुन अध्यक्षपदाची शपथ घेतली.
याप्रसंगी डॉ. सतीश बापट (जा. वे. फौंडेशन केंद्रीय समिती सदस्य), रामदास रेवणकर (जा. वे. फौंडेशन फेड. 2 क अध्यक्ष), डॉ. राजकुमार पोळ ( जा. वे. फौंडेशन फेड. 2 क माजी अध्यक्ष), सौ. मंदाकिनी साखरे (जा. वे. फौंडेशन फेड. 2 क सचिव), सौ. स्नेहल कुलकर्णी (जा. वे. फौंडेशन. फेड.2 क) यांच्यासह हेमंत कबाडे , संजय तेलसिंगे, सौ. रूपा बुगड कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्या उपस्थितीत आणि युनिट डायरेक्टर युनिट 3 सौ. सुनिता शेरीकर यांच्या अधिपत्याखाली हा शपथविधी संपन्न झाला.
स्वागत व प्रास्ताविक संगिता नेमीष्टे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. ज्योतिकिरण भोसले यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन केले. सौ. ज्योती लाटणे यांनी आभार मानले. याप्रसंगी सौ. संगीता कोकितकर, ज्योती मांगलेकर, कविता पाटील, विजया माळी, स्मिता चौगुले, राधिका शिंदे, सौ. सोनाली भोसले, सौ. शिंदे, आरती खाडे यांची उपस्थिती होती. तर सौ. शाहीन चौगुले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.