Monday, May 13, 2024
Homeराजकीय घडामोडीशरद पवार यांची सभा सुरु असताना कट्टर समर्थकाच्या साखर कारखान्याचे गोडाऊन सील

शरद पवार यांची सभा सुरु असताना कट्टर समर्थकाच्या साखर कारखान्याचे गोडाऊन सील

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना शरद पवार यांचे कट्टर समर्थकांचा आहे. कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा अभिजित पाटील यांच्याकडे आहे. परंतु या कारखान्यावर द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पंढरपूरमध्ये शरद पवार निवडणूक दौऱ्यावर आहेत. त्याची प्रचार सभा सुरु होती. करमाळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा सुरू होती. या सभेत शरद पवारांचे भाषण सुरू होते. त्याचवेळी कारखान्यावर कारवाई सुरु झाली. याची माहिती मिळताच अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची सभा सोडून कारखान्याकडे धाव घेतली.

गोडाऊनमध्ये एक लाख पोती साखर

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, कारखान्याच्या ३ गोडाऊनला द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सिल केले आहे. गोडाऊनमध्ये जवळपास एक लाख पोती साखर आहे. द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कारखान्यावर जवळपास 435 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. सभेत रोहित पवार यांनी आपल्या भाषणात कारखान्यावर कारवाईची भीती व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सिल झाले. कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस लावण्यात आली आहे.

 

विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही- अभिजित पाटील

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाचे गोडाऊन सील झाले. त्यावरुन अभिजित पाटील यांनी नाराज व्यक्त केली. वेळप्रसंगी स्वतःला गहाण टाकू, पण विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही. पवार साहेबांशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बँक म्हणते, वेळोवेळी सूचना दिल्यात

विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे. बँकेची कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज कारखान्यातील संचालकांनी भरलेले नाही. त्यामुळे बँकेत कारखान्याचे असलेले खाते ‘एनपीए’मध्ये गेले आहे. बँकेने या संदर्भात कारखान्याला वेळोवेळी नोटीस दिली आहेत. त्यानंतर थकबाकी भरली गेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -