कडी कोंडा उचकटून, कुलूप तोडून पतसंस्थेच्या कॅशियर काउंटर मधील रक्कम लंपास केल्याची घटना नुकताच उघडकीस आली आहे. ही घटना कोरोची येथे घडली.
कोरोचितील शिवपार्वती नागरी सहकारी पतसंस्थेत ही चोरी झाली आहे. याचबरोबर येथील एका बारमध्ये देखील अशाच प्रकारे चोरी झाली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील दुसरीकडे फिरवून हा प्रयत्न केला आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.