Monday, December 23, 2024
Homeराशी-भविष्यराज्यात महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक रिंगणात, पण आता नरेंद्र मोदींसाठी काशीत जाऊन...

राज्यात महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक रिंगणात, पण आता नरेंद्र मोदींसाठी काशीत जाऊन प्रचार

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. यामुळे राज्यातील सर्व उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहे. परंतु नाशिकमधील महायुती विरोधात लढणारे उमेदवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदार संघात १ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. ते आता नरेंद्र मोदी यांचा काशीत जाऊन प्रचार करणार आहेत.

का करणार नरेंद्र मोदी यांचा प्रचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले राजकारणातले आदर्श आहेत. आपण त्यांच्यासाठी प्रचाराला वाराणसीला जाणार असल्याचे स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी ‘टीव्ही-9 मराठी’शी बोलताना सांगितला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचचा आपला स्वतःचा निर्णय होतो. परंतु देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. यामुळे आपण काशीत जाऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी म्हटले आहे. भाजपामध्ये जायचे की नाही? हे लोकसभेच्या निकालानंतर ठरवू, असे त्यांनी म्हटले आहे.

 

नाशिकमध्ये मोदींची झाली नव्हती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकी दरम्यान नाशिकमध्ये सभा झाली होती. या सभेच्या वेळी शांतिगिरी महाराज यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यावेळी नरेंद्र मोदी आणि शांतीगिरी महाराज यांची भेट झाली नव्हती. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी विविध माध्यमातून प्रचार केला. ग्रामीण भागात थेट बैलगाडीतून त्यांनी प्रचार केला होता.

शांतीगिरी महाराज यांच्या माघारीसाठी अनेक प्रयत्न

शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. परंतु महायुतीने हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी अखेरपर्यंत माघार घेतली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -